Kalyan News : Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : चिंता वाढली ! कल्याण-डोंबिवली बनतंय कोरोनाचं हॉटस्पॉट; तिसऱ्या व्यक्तीचा बळी गेला

corona Update : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचं हॉटस्पॉट बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवलीत तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबई जवळ असलेल्या कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला आहे. या शहरात कोरानाने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. तिघांच्या मृत्यूनंतर परिसरात राहणाऱ्या लोकांनी सजग राहण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत कोरोनाची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत तिघांचा बळी गेल्याची माहिती हाती आली आहे. मुंबईला लागून असलेल्या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. कोरोनातून बरे झालेल्या ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनाचे दोन रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.

कल्याणमध्ये कोरोना झालेला एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. कल्याण-डोंबिवलीत ७७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर या व्यक्तीला सहव्याधी होत्या. ७७ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने कोरोना रुग्णाची संख्या ३ वर पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT