SambhajiRaje Chhatrapati Saam TV
मुंबई/पुणे

'ते राजे आहेत त्यांनी राजेंसारखं वागलं पाहिजे'; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

'ते कधी भाजपच्या बाजूने बोलायचे तर कधी विरोधात बोलतात'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज राज्यसभेच्या जागेबाबत वक्तव्य करताना संभाजीराजे छत्रपती यांना उद्देशून 'ते राजे आहेत त्यांनी राजेंसारखं वागलं पाहिजे' असं वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले, 'राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा आहे. हे सर्व हुशार राजकारणी आहेत. तसंच संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांना भाजपने सन्मानाने याआधी पद दिलं आहे. ते राजे आहेत त्यांनी राजेंसारखं वागलं पाहिजे. ते कधी भाजपच्या बाजूने बोलायचे तर कधी विरोधात बोलतात. मोदींनी आम्हाला सांगितले होते की त्यांना आम्ही राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली होती.'

पाहा व्हिडीओ -

तसंच संजय राऊतांनी (Sanjay Raut) राजेंचा सन्मान कसा करायचा ते आम्हाला माहीत आहे. राऊतांनी आम्हाला शिकवू नये असंही ते म्हणाले. मोदी सध्या विदेशात आहेत त्यामुळे त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, शिवाय देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) इतकी कामे केलीत त्यामुळे केंद्राने तिसरी जागा लढवायला परवानगी दिली तर आम्ही तिसरी जागा लढवू आणि जिकुंही असा विश्वास व्यक्त करतच त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. शिवसेनेचा मेन उमेदवारच पडेल की काय अशी भीती त्यांना वाटते असल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, यावेळी पाटील यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) देखील निशाना साधला, 'ओबीसीना आरक्षण मिळाले तर संघाला आनंद होईल. सर्व पक्षांना एकत्र यायला हवं म्हणून यांना काही तरी इश्यू लागतात. केंद्राचे म्हणणे देखील जात निहाय जनगणना व्हावी असंच आहे. मात्र, शरद पवार नेहमी खोटं बोल पण रेटून बोल असं करतात. तसंच शेड्युल कास्ट, ओबीसी आणि मराठा आरक्षणाला कधीच संघाने विरोध केला नाही. शिवाय देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना ओबीसींची वेगळी नोंदणी झाली पाहिजे असा ठराव झाला होता असही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhudargar Fort History: कोल्हापूरातील ऐतिहासिक भुदरगड किल्ला माहितेय का? जाणून घ्या इतिहास आणि पर्यटकांसाठी टिप्स

लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

Diwali Padwa Gift: या दिवाळीत बायकोला करा खूश, या युनिक डिझाईन्सच्या अंगठ्या ठरतील परफेक्ट

Sangli News : पाडव्याच्या मुहूर्तावरील हळदीचा सौदा, प्रति क्विंटल १७,८०० रुपये भाव मिळाला, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित

SCROLL FOR NEXT