'मराठा आरक्षणाप्रकरणी विश्वासघात झाल्याने संभाजीराजेंनी भाजपची साथ सोडली'

'भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक, विश्वासघात केला म्हणूनच संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपची साथ सोडली'
SambhajiRaje Chhatrapati
SambhajiRaje ChhatrapatiSaam TV
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई : भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर फसवणूक, विश्वासघात केला म्हणूनच, संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपची साथ सोडल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केलं आहे.

राज्यसभेच्या (Rajya Election 2022) सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार आहेत. मात्र, यासाठी त्यांना शिवसेनेसह इतर राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला नाही.

तसंच संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) शिवसेनेत आले तर त्यांना आपण उमेदवारी देऊ अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र, संभाजी राजेंनी आपण अपक्षच लढणार असल्याचं सांगितल्यामुळे सेना आणि राजे यांच्यातील चर्चांना पुर्णविराम मिळाला मात्र या सर्व घडामोडींमोळी राज्यातील मराठा नेत्यांसह राजे समर्थक नाराज झाले असून त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल चढवला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी एक ट्विट करत संभाजीराजे छत्रपती यांचा भाजपने विश्वासघात केला म्हणून त्यांनी भाजपची साथ सोडल्याचं म्हंटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमाणेच भाजपने राज ठाकरे यांचाही वापर करून घेतला आणि आता सोडून दिले. 'गरज सरो वैद्य मरो' हीच फडणवीस निती असल्याचं ट्विट लोंढे यांनी केलं आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, शिवसेनेने महाराजांना उमेदवारी न देता कोल्हापूरमधील संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवार घोषीत केलं आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांना प्रश्न विचारला असता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होते. कोल्हापूरचे संजय पवार हे कट्टर शिवसैनिक आहेत, तसेच ते मावळे देखील आहेत आणि मावळे असतात त्यामुळे राजे असतात, राजे मोठे होतात.' असं वक्तव्य केल्याने मराठा नेते चांगलेच आक्रमक झाले होते. शिवाय राऊतांनी छत्रपती घराण्याचे उपकार विसरु नये असं देखील मराठा नेते आबाबसाहेब पाटील म्हणाले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com