Uddhav Thackeray In MVA Mahamorcha
Uddhav Thackeray In MVA Mahamorcha Saam TV News
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray In Morcha: महाराष्ट्राला लुटायला आलेले हे लफंगे आहेत; महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

Rashmi Puranik

Uddhav Thackeray In Mahamorcha: भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल सतत करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा  (Mahavikas Aghadi) महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येत आला. यावेळी शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. महाराष्ट्राला लुटायला आलेल हे लफंगे आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आजच्या महामोर्चात (Morcha) सहभागी झाले होते. यावेळी ते आपल्या भाषणात म्हणाले की, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशानं पाहिला असेल. मोर्चाची घोषणा केली तेव्हा मला काहींनी विचारलं तुम्ही एवढे चालणार का? मी म्हटलं मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्रप्रेमी नुसतेच नाही, तर महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजवर आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्यानंतर असं दृश्य सगळ्या जगानं पहिल्यांदा पाहिलं असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Mahavikas Aghadi March News)

पुढे ते म्हणाले अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुणीही यायचं आणि डिवचून जायचं. आज सर्व पक्षांचे झेंडे इथे दिसतायत, ही महाराष्ट्राची ताकद आहे. फक्त महाराष्ट्रद्रोही इथे नाहीयेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शिंदे गटावर टीका

यावेळी त्यांनी बंडखोरी करुन शिंदे गटात गेलेल्या आमदारांवरही बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो म्हणणारे तोतये आहेत. आमची खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही आणि असं जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.   (Latest Marathi News)

राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचाही समाचार घेतला आहे. मी तर त्यांना राज्यपालच मानत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच त्या पदाचा आम्ही नक्की मान राखतो. त्या पदावर कुणीही बसावं आणि कुणालाही टपल्या माराव्या हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे राज्यपाल कोण असावा? फक्त केंद्रात जो बसतो, त्यांच्याघरी काम करणारा माणूस कुठेतरी सोय म्हणून पाठवायचा नसतो. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. त्यांनी त्यांच्यासारखं वागलं पाहिजे असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिला आहे.  (Breaking Marathi News)

त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल हे बोलतायत. जर ते नसते, तर आज आपण कुठे असतो त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्यांनी 'भीक' शब्द वापरून दाखवून दिलं आहे. त्या लोकांनी तेव्हा शेणमार, धोंडमार सहन केली पण ते डगमगले नाही. त्यांच्यामुळे आपण शाळेत गेलो. आपण तसे गेलो नसतो, तर आपणही यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे. शब्दांना काही अर्थ असतो की नाही उद्धव ठाकरे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यांच्या मंत्रिमंडळात कसे मंत्री आहेत? एक तर बौद्धिक दारिद्र्य असणारे आहेत. दुसरे सुप्रिया सुळेंचा अपमान करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीये. हे लफंगे आहेत. महाराष्ट्र लुटायला आले आहेत. शिवाजी महाराजांनी मातेबद्दल, परस्त्रीबद्दल आदर कसा ठेवायचा याची शिकवण दिली आहे.

तिसरे आपले मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांनी तर आग्र्याहून महाराजांची सुटका झाली, त्यांची बरोबरी या खोकेवाल्यांशी केली आहे. कुठे तुम्ही, कुठे शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आणि यांनी खोके घेऊन, लांडीलबाडी करून, पाठीत वार करून, तेही आपल्या राजकीय पक्षाच्या म्हणजे स्वत:च्या आईच्या पाठीत नव्हे, कुशीत वार करून सरकार स्थापन केलं, त्यांची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांशी करताय? अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या गर्दीमुळे महाराष्ट्रद्रोह्यांचे डोळे उघडले पाहिजेत. जर ते उघडणार नसतील, तर ते कधीच उघडू नयेत, अशी आपण प्रार्थना करुयात. जा, निघून जा इकडनं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आहे.

तगड्या पोलिस बंदोबस्तात महामोर्चा

दरम्यान महाविकास आघाडीच्या मोर्चाला २ ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. यात २ अतिरिक्त पोलिस आयुक्त ४ ते ५ पोलिस उपायुक्त यांच्याद्वारे हा बंदोबस्त हाताळण्यात आला. या मोर्चातकुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुशंगाने स्थानिक परिसरात पोलिस आवाहन केलं होतं. सोबतच या मोर्चात SRPFच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवून होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: 'मोदी-राज' सभेनंतर उद्धव ठाकरे सुपरफास्ट, मुंबईत एकाच दिवशी 4 सभांचा धडाका

Maharashtra Politics 2024 : 'अजित पवारांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत'; फडणवीसांची अजितदादांना जाहीर क्लीन चिट

Lord Shiva: महादेवाच्या पिंडावर थेंब-थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं?

South Mumbai Lok Sabha: दक्षिण मुंबईचा खासदार कोण होणार? शिवसेनेच्या दोन गटात लढत

Vaibhav Kale : कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; गाझातील बॉम्ब हल्ल्यात झाले होते शहीद

SCROLL FOR NEXT