MVA Mahamorcha: शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महापुरुषांचा अपमान, राज्यपालांना हटवलं पाहिजे; महामोर्चातून अजित पवार कडाडले

Ajit Pawar In Mahamorcha : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी आपल्या भाषणातून सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
Ajit Pawar In Mahamorcha
Ajit Pawar In Mahamorcha Saam TV
Published On

MVA Mahamorcha News: महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी राज्यात आज महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी झाले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी आपल्या भाषणातून सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत असा आरोप करत त्यांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. (Ajit Pawar Latest News)

Ajit Pawar In Mahamorcha
Kalicharan Maharaj: डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवून ते पाणी मुलीला पाजा; लव्ह जिहादवरुन कालीचरण महाराज यांचं वादग्रस्त विधान

आपल्या भाषणात अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, युगपुरुष शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. महाराजांच्याबाबत बेताल वक्तव्य करतात. यामागे मास्टरमाईंड कोणा आहे? एकदा चूक झाली की माफी मागता येते, पण असे घडत नाही. राज्यपाल बोलले की मंत्री बोलतात आणि वारंवार बोलतात. यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे. (Latest Marathi News)

पुढे ते म्हणाले की, आज या उन्हात तुम्ही आले आहात तर राज्यकर्त्यांना धडकी भरेल. महापुरुषांविरोधात वक्तव्य करतात याबाबत बिल आणावे अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही भाष्य केलं. ते म्हणाले. राज्यात अडीच वर्ष आमचं सरकार होतं. याआधी आमचं सरकार असताना कधी बॉर्डरची गावं कर्नाटकात किंवा तेलंगणात जायचे असे बोलले नाही. भाजपला या महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. (Breaking Marathi News)

अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि सरकारच्या मनात धडकी भरवण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आहे. संकट महाराष्ट्रावर असते त्यावेळी अस्मितेसाठी महाराष्ट्र पेटून उठतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. पण, या राज्यात महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम होते यामागे कोण मारस्टरमाईंड आहे? संविधान आणि कायद्याचा विसर या सरकारला पडला आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar In Mahamorcha
Sanjay Raut : सरकारने विरोधी पक्षांना भाषणही लिहून द्यावे; मोर्चावरील अटींवरून राऊतांचा हल्लाबोल

महामोर्चाचा उत्साह बघितल्यानंतर धडकी भरली असणार आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. तसेच राज्यपालांना हटवले पाहिजे, अशा पध्दतीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कायदा करावा लागला तर त्यासाठी अधिवेशनात सरकारला भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्राला साधुसंताचा वारसा आहे, असे असताना हे का घडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मराठी भाषिकांवर हल्ले झाले, हा महाराष्ट्र हे कदापी सहन करणार नाही.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महापुरुषांचे अपमान होत आहे. सीमावाद प्रकरण पुढे आणले आहे असा आरोप करत आपण एकजूटता दाखवली पाहिजे, सरकारला जागा दाखवण्याचे काम करुया असा हल्लाबोल अजित पवारांनी सरकारवर केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com