Kalicharan Maharaj Latest News: आपल्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत असलेले कालीचरण महाराज यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला आहे. "डुकराचा दात रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या मग तिचं डोकं ठिकाण्यावर येईल" असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. अहमदनगर येथे सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात कालीचरण महाराज, काजल दीदी हिंदुस्थानी यांनी मोर्चात सहभाग घेतला होता. याच मोर्चात कालीचरण महाराज यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. (Ahmednagar News)
कालीचरण (Kalicharan) महाराज यांच्या अजब दाव्याने मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. यावेळी कालीचरण महाराज म्हणाले, लव्ह जिहादच्या रोजच्या 40 हजार केसेस आहे, दिल्लीत 35 केसेस मुलींच्या आल्या आहेत. मुलीचे वशीकरण करतात, धडग्यावर जे माथा टेकवताय त्यांच्या पोटी भूत जन्माला येतात असाही अजब दावा केला आहे. तिकडे गेले की तुमच्यात मंत्र-तंत्र होते, त्यासाठी डुकराचा दात रात्र भर पाण्यात ठेवा आणि लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलीला ते प्यायला द्या मग बघा डोकं ठिकण्यावर येतं आणि सर्व भूत-प्रेत, मंत्र-तंत्र बाहेर येईल असा अजब सल्ला कालीचरण महाराज यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
कालीचरण महाराज यांनी यावेळी मुस्लिम धर्मीयांवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, धर्म म्हणजे सनातन धर्म. कोणताही मौलाना म्हणणार नाही इस्लाम धर्म आहे, त्यांना लहानपणापासून मदारश्यात शिकवले जाते. तुम्हाला काय शिकवले जातात असा सवाल कालीचरण यांनी केला. तसेच सर्व आतंकवादी मुस्लिमच आहे, 5 लाख मंदिर फोडली होती, सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर हिंदूराष्ट्र झालं असतं असंही मत कालीचरण महाराज म्हणाले.
पुढे कालीचरण महाराजांनी दावा केला की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, मुस्लिमांनवर विश्वास ठेऊ नका. दरोरोज 1 लाख गोवंश हत्या होते, हिंदू द्वेष करत नाही मात्र हिंदूंच्या मनात द्वेष निर्माण होत आहे असंही ते म्हणालेत. तसेच आपण सडक्या जातीवादाचा बुरखा पांघरलाय, आम्हाला परप्रांतीय नको असे आपण म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे राजे नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचा राजा होता असंही कालीचरण महाराज यांनी म्हंटलं आहे. (Breaking Marathi News)
कालीचरण महाराज हे मूळचा महाराष्ट्राच्या अकोल्यातील (Akola)असून त्यांचे खरे नाव अभिजीत धनंजय सारंग (Abhijeet Dhananjay Sarang) असे आहे. अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ ते राहतात. त्याच्या आईचं नाव सुमित्रा तर वडिलांचे नाव धनंजय सारंग आहे. कालीचरण महाराज हे कालिभक्त आहे. त्यामुळे त्यांने कालिचरण हे नाव धारण केले.
कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचे ते सांगतात. त्यांनी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्त्रोत्र म्हटलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले. 2017 मध्ये कालीचरण महाराज यांनी अकोला महापालिकेची निवडणुक (Akola Municipal Corporation Election)देखील लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभावाचा सामना करावा लागला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.