Kirit Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

माझ्यावरती केलेल्या 57 कोटींच्या आरोपांचे पुरावेच नाही- किरीट सोमय्या

किरीट सोमय्यांची आज दुसऱ्या दिवशी चौकशी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मी सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे. कोर्टाने ४ दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीला दिले आहेत. ४ दिवस रोज ३ तास त्यांना हवी ती माहिती घेऊ शकतात, असे वक्तव्य भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मीडियाशी बोलताना केले आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणी अडचणीमध्ये सापडलेले भाजपचे नेते किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) आर्थिक गुन्हे विभागातर्फे चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये किरीट सोमय्यांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तो खटला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

किरीट सोमय्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी आव्हान केले आहे, ते म्हणाले की, आमच्याकडे जी माहिती आहे ती जगाला माहिती आहे. जे काय आमच्याकडून हवे ते सगळी माहिती आम्ही देऊ, ४ दिवस काय ४ वर्षे उद्धव ठाकरे यांनी माझी चौकशी करावी, कारण पाप त्यांच्या पोटामध्ये आहे. हायकोर्टात हे सगळं प्रकरण आहे आणि हायकोर्टाने विचारले आहे की, ५७ कोटी रुपयांचा आकडा तुम्ही आणला कुठून? आता पोलिसांनी संजय राऊतांना विचारावा लागणार की आरोप कसा केला गेला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले होते की, किरीट सोमय्या यांनी ५७ कोटी रुपये ढापले आहेत.

तसेच त्यांनी आपल्या अकाउंट मधून मुलाच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले आहेत. या संदर्भामध्ये माहिती कोर्टाने ठाकरे सरकार कडून मागवण्यात आले आहे. मात्र, ठाकरेंकडे काहीच नाही, नुसती फेकाफेकी त्यांनी यासंदर्भात केली आहे. यामुळे सोमय्या कुटुंबांनी कधी देखील पैसे ढापण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सांगत सोमय्यांनी संजय राऊतांचे आरोप खोडून काढले आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजपचे नेते किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) आर्थिक गुन्हे विभागातर्फे चौकशी करण्यात येत असून यावर सोमय्या म्हणाले आहे की, मला न्यायव्यवस्थेने सांगितले आहे की, पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करा. मी न्यायदेवतेचा सन्मान करत आहे.

ठाकरे सरकार सारखा अपमान करत नाही. सोमय्या यांनी काल माध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर आतापर्यंत साडे सात हजार कोटी, ईडी सोबत पार्टनरशिप, जुहूच्या १००कोटीचा प्लॉट, वसई पालघरमध्ये वाधवान बरोबर ४२६ कोटी रुपयांचा आरोप, असे जवळपास १२ आरोप माझ्यावर लावण्यात आले आहे. एसआयटी स्थापन केल्या आहेत. मात्र, खोदा पहाड निकला चूहा अशी स्थिती आहे, असे सोमय्यांनी म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindkheda Exit Poll: पवारांचा करिष्मा चालणार का? सिंदखेडाची जनता कोणाला निवडणार? पाहा Exit Poll

Exit Poll : धीरज देशमुख पुन्हा आमदार होणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Exit Poll: धामणगाव मतदारसंघातून विरेंद्र जगताप होणार आमदार? पाहा Exit Poll

Nevasa Exit Poll: नेवासा मतदारसंघात कोण होणार आमदार? Exit पोलचा अंदाज काय

Exit Poll Maharashtra : राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT