"महापालिका निवडणूका जिकंण्यासाठी तणाव निर्माण केला जातोय"- संजय राऊत

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत आहेत
Sanjay Raut
Sanjay Raut Saam TV
Published On

मुंबई: देशात २ प्रमुख शहराबरोबरच अनेक शहरामध्ये दंगलीचे वातावरण तयार केले गेले आहे. सत्ताधारी पक्षाकडून हे वातावरण केले गेले आहे. देशाच्या राजधानीमध्ये दंगल होत आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे महापालिकेचे निवडणूक येत आहे. अगोदरच निवडणुका पुढे ढकले आहेत. आता दंगली घडवल्या. महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी हे सगळं सुरू आहे. त्यांच्याकडे काही मुद्दे नाही. यामुळे हा प्रकार सुरू आहे, असे शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. मुंबईमध्ये (mumbai) हा तणाव सुरू केला आहे. कुणाला तरी पकडून हे काम केले आहे.

हे देखील पहा-

देशात शहरात असे तणाव निर्माण कराल तर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेली. ती अजून ढासळणार आहे. लोक आता कोव्हिडमधून बाहेर पडले आहेत. त्यामध्ये तुम्ही असे करत असाल तर देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षा देखील डबघाईला जाणार आहे, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. सत्ताधाऱ्यांनी प्रायोजित केलेले दंगे आहेत. रामनवमी, हनुमान जयंती वगैरे सण लोकांनी आतापर्यंत शांतपणे साजरे केले आहेत. त्यावेळी कधी दंगली झाल्या नाही.

दिल्लीच्या कायदा सुव्यवस्था सरकारच्या हाती आहे. कारण महापालिका निवडणुकांवर भाजपचे लक्ष आहे. पराभवाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आता पालिका हातून जाणार लक्षात आल्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली, असं राऊत म्हणाले आहेत. यामुळे देशाची अर्थव्यवस्था रोजगार व्यापर उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. लोकांच्या आता चुली पेटू लागले आहेत. उद्योगपती व्यापारी या संकटातून सावरत आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळत असताना तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केली आहे. त्याला भाजपच जबाबदार आहे.

Sanjay Raut
दिलासादायक! गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1247 नवे रुग्ण

भाजपला देशाशी लोकांचे शेतकरी, कष्टकऱ्यांची काही पडलं नाही. त्यांना दंगली घडवून राजकारण करून महापालिका जिंकायचे आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. जिथे शक्य तिथे आम्ही एकत्र येऊन लढू. नांदेडमध्ये आम्ही जिंकलो. हा यशस्वी फॉर्म्युला झाला आहे. त्याची भीती वाटणाऱ्यांनी दंगलीची भीती निर्माण केली आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com