There is no risk of heart attack due to corona vaccine, ICMR refuted the claim Saam TV
मुंबई/पुणे

Heart Attack Reason: कोरोना लसीमुळे नाही, तर या गोष्टींमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं; आयसीएमआरने सांगितलं खरं कारण

Heart Attack Major Reason: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा प्रमाण वाढलं असं मध्यंतरी दावा करण्यात येत होता. मात्र, हा दावा आयसीएमआरने खोडून काढला आहे.

गोपाल मोटघरे

Heart Attack Major Reason: आजकालच्या धावपळीच्या जगात अलीकडे तरुण-तरुणींना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा प्रमाण वाढलं असं मध्यंतरी दावा करण्यात येत होता. मात्र, हा दावा आयसीएमआर अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चने खोडून काढला आहे.

कोरोना लसीमुळे (Corona Vaccine) नाही, तर लॅक ऑफ फिजिकल अॅक्टिव्हिटीमुळे लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे, असा दावा स्वतः आयसीएमआरने केला आहे. लॉकडाऊनमध्ये बदललेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोकांना हहृदय विकाराचा झटका येत असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे.

ज्या लोकांना हार्ट अटॅकचा (Heart Attack) झटका आला अशा लोकांच्या शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास आयसीएमआरने केला. अलीकडे ज्या लोकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला, असे लोक कोरोना काळात बरेच दिवस रुग्णालयात दाखल होते.

तसेच त्यांच्यामध्ये फिजिकल अँक्टिव्हिटीचा मोठ्या प्रमाणात अभाव होता, असा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी केला आहे. दरम्यान, काही लोकांना जीममध्ये व्यायाम करत असताना, तर काही लोकांचा खेळताना हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.

यावरही देखील आयसीएमआरने स्पष्टीकरण दिलं आहे. जिममध्ये वर्कआउट करून हृदय विकराचा झटका येत नाही. तर फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचं धोका वाढतो. असा दावा हसल जिमचे फाउंडर तसेच फिटनेस ट्रेनर आशिष शशिकांत जाधव यांनी केला आहे.

देशात कोरोना महामारीचा (Corona Virus) प्रसार झाल्यानंतर अनेकांनी आपले जीवन जगण्याची शैली बदलली. काही जणांनी आपल्या आहारात बदल केला. तर काहींनी फिटनेसकडे दुर्लक्ष केलं. कोरोनामुळे बदल झालेल्या जीवनशैलीत स्वत:ला फिट आणि तंदुरूस्त ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात आहार आणि शरीराची कसरत करणे गरजेचे आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

SCROLL FOR NEXT