Navi Mumbai, Mahape Midc saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : महापे एमआयडीसीतील कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सुरक्षारक्षकांना बांधून लाखाेंची चोरी

पाेलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करावा अशी मागणी हाेऊ लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai : नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत (mahape midc) चाेरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. काही भागात चाेरटे सुरक्षा रक्षकांना शस्त्रांचा धाक दाखवत कंपन्यातील साहित्य चाेरत असल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Maharashtra News)

नवी मुंबईतील महापे एमआयडीसीमध्ये असणाऱ्या सुपर स्टीम बॉयलर कंपनीत चोरांनी सुरक्षा रक्षकांना दोरीने बांधून कोयत्याचा धाक दाखवून चोरी केली. चोरांनी कंपनीतील तांब्याची वायडींग केबल वायर, पितळेचे नोझल आणि इतर वायर असा लाखो रुपयांचा माल कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या कंपाऊंडला भगदाड पाडून चोरून नेला आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी याच कंपनीतील सुरक्षा रक्षकांना बंदुकीचा धाक दाखवून चोरीची घटना झाली होती. अद्याप त्या प्रकरणातील चाेर पोलिसांना सापडले नाहीत. त्यातच पुन्हा याच कंपनीत चोरीची घटना घडल्याने व्यवस्थापन चक्रावले आहे. या घटनांमुळे नवी मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta Photos: रॉयल लूकमध्ये दिसली अभिनेत्री, फोटो पाहून सौंदर्याचं कराल कौतुक

Padmagad Fort History: सिद्दीला रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्यात बांधला हा जलदुर्ग; नेमका आहे तरी कुठे?

Tuesday Horoscope: मेषसह ४ राशींचा मानसिक ताण वाढेल! काहींवर पैशाचा पाऊस, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: जैन मुनी निलेशचंद्र यांचं उपोषण मागे, १५ दिवसानंतर घेतली माघार

Local Body Election : अजित पवार गट भाजप, शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत, धुळ्यात राजकारण तापणार

SCROLL FOR NEXT