Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : शिवबाच्या बाल मावळ्याची मृत्यूशी झुंज अपयशी; मावळात शाेककळा

आर्यन हा कार्ला येथील श्री दुर्गा परमेश्वरी विद्यानिकेतन विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता.
aryan kondbhar, Pune,
aryan kondbhar, Pune, saam tv

Maval News : शिवजयंती निमित्त मल्हार गडावरून मावळात शिवज्योत घेऊन येणाऱ्या टेम्पोला झालेल्या अपघातात सुमारे 35 शिवभक्त जखमी झाले हाेते. त्यापैकी 13 वर्षीय शिवभक्ताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आर्यन सोमनाथ कोंडभर (aryan somnath kondbhar) असे मृत्यू झालेल्या बाल शिवभक्ताचे नाव आहे. (Maharashtra News)

aryan kondbhar, Pune,
Chhatrapati Sambhaji Nagar : PM आवास याेजना फसवणुक प्रकरणी छत्रपती संभाजी नगरात ईडीची छापेमारी (पाहा व्हिडिओ)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त (shiv jayanti) दहा मार्चला शिलाटणे येथील युवक शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगड (ता. पुरंदर) येथे गेले होते. शिवज्योत घेऊन परतत असताना ताथवडे येथे पहाटे साडेचार वाजता पाठीमागून आलेल्या भरधाव मालवाहू ट्रकने पायी चाललेल्या शिवभक्तांना आणि त्यांच्या वाहनांना जोरदार धडक दिली होती.

aryan kondbhar, Pune,
Kolhapur : चिठ्ठी लिहून मुलीची काेल्हापूरात आत्महत्या; Sex साठी युवकाचा आग्रह, पाेलिस तपास सुरु

या अपघातात आर्यनसह सुुमारे 35 युवक जखमी झाले होते. त्यापैकी तिघे जणांची प्रकृती गंभीर होती. जखमी आर्यनवर रावेत येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या मेंदूला मार लागला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु त्याची गुरुवारी मृत्यूशी झुंज अखेरची ठरली. आर्यनच्या निधनामुळे शिलाटणे गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com