Narendra Modi/Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

'पवारांनीच मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं'; मोदींचं 'ते' भाषण सोशल मीडियावर व्हायरल (पहा Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण आज सोशल मीडियावर व्हायरल होत असून या भाषणात मोदी सांगत आहेत की, 'पवारांनीच मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : शरद पवारांच्या हिंमतीने आणि कौशल्याने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं होतं असं वक्तव्य पंतप्रधानांनी (Narendra Modi) केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉड्रिंग प्रकरणात अटक झाल्यापासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं नाव सतत चर्चेत आलं आहे. दरम्यान मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांच नाव दाऊदशी जोडलं जात असल्याचं वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं.

दरम्यान त्यांच्या याच वक्तव्यावरुन भाजप नेते माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांचे संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले होते. 'शरद पवारच दाऊदचा माणूस आहे का? “मला संशय येतो की शरद पवारच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. खरंच संशय येतो असं वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पवारांमुळे मुंबई अंडरवर्ल्डपासून वाचवलं असल्याचं वक्तव्य केलेला व्हिडीओ आज सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण आज सोशल मीडियावर व्हायरल होत असून या भाषणात मोदी सांगत आहेत की, 'एक दशक होत जेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड च्या ताब्यात गेली तर काय होईल, असा प्रश्न होता त्यावेळी शरद पवार यांची हिंमत आणि कौशल्य होते की मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं.' असं वक्तव्य मोदी यांनी केलं होत त्यामुळे आता शरद पवारांना अंडरवर्ल्डशी जोडलेल्यांना पंतप्रधानांनीच उत्तर दिलं असल्याचं राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते म्हणत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

Ramdas Athwale : महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story

Maharashtra News Live Updates: दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी शरद पवार यांची बैठक होण्याची शक्यता

Junnar Crime : शेतमालाची चोरी करण्यास विरोध; बाजार समितीत तरुणांकडून व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

Chalisgaon Crime : गृहकर्जाची बँकेतून काढली एक लाख ९० हजारांची रोकड; चोरट्यानी संधी साधत लांबविली रोकड

SCROLL FOR NEXT