रघुनाथ कुचिक गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

रघुनाथ कुचिक यांची DNA टेस्ट करा; पिडीत तरुणीची मागणी, नाहीतर कोर्टात...

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: रघुनाथ कुचिक प्रत्येक गोष्ट खोटं बोलत आहेत , आत्तापर्यंत मी गप्प होते कारण माझ्याकडे माझ्या डीएनए चाचणीचा रिपोर्ट नव्हता पण आता तो आला आहे. आता रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी अशी मागणी रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडितेने केली आहे. त्याचबरोबर माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे घेऊन मी मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं देखील त्या पिडीतेने पुण्यात पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे.

राघुनाथ कुचिक यांची 'ती' टेस्ट खोटी

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने बलात्काराचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रघुनाथ कुचिक यांनी एक चाचणी करत मी वडील होऊ शकत नाही असं वैद्यकीय रित्या सिद्ध झाला आहे असं सांगितलं होतं. मात्र रघुनाथ कुचिक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असून माझा गर्भपात झालेलं बाळ त्यांचचं होता असा आरोप देखील पिडीतेने केला आहे.

त्या नंबरचा फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात देणार

रघुनाथ कुचीक हे नेहमी मला मेसेज करायचे, आणि आता ते म्हणतात की माझा नंबर मोर्फ करून वापरला गेला मात्र तसं नसून मी त्या नंबरची फॉरेन्सिक टेस्ट केली आहे आणि ती टेस्ट सरकारी असते . ज्या फोरेन्सिक टेस्टमधून सगळे काही उघड झाल असून आता ते फॉरेन्सिक रिपोर्ट देखील मी कोर्टात देणार असल्याचं त्या तरुणीने सांगितलं आहे.

महिला आयोगाने माझ कधीचं एकलं नाही

या सगळ्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने, तरुणीची आरोप करत आहेत त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगेचच ती मागणी मान्य देखील केली आहे आता त्यावर विचार होत असल्याचं सांगितलं होतं. त्यावर बोलताना या पीडितेने मी अनेकदा रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला उत्तर दिलं नाही. ज्याप्रमाणे रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची मागणी मान्य झाली तसाच न्याय मलाही मिळावा अशी अपेक्षा पीडित तरुणीने आज बोलताना व्यक्त केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT