भाजपच्या माजी खासदाराचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य...(पहा Video)

माजी खासदार धनंजय महाडिक यांच महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य. छत्रपती ताराराणी महाराणींच्या नगरित महिलांचे योगदान विसरलात का?, सर्वपक्षीय महिलांचा प्रश्न.
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadikसंभाजी थोरात

कोल्हापूर: माजी खासदार धनंजय महाडिक याचे महिलाविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. महिलांच्या कर्तृत्वावर उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे धनंजय महाडिक अडचणीत आले आहेत. दरम्यान, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचाराच्या दरम्यान वक्तव्य केले आहे. धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ-

माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलाविषयी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या उमेदवार महिला आहेत. यामुळे महिलेला मतं द्या, असं ते सांगतील. पण जे काम तुमचा प्लंबर असलेला, इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो, ते तुम्हाला जमणार आहे का? ज्याचे काम त्यानंच करावं, अशी वक्तव्य महाडिक यांनी केल्याचे या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे.

हे देखील पहा-

भाजप उमेदवार सत्यजित कदम यांनी बुधवारी सकाळी कोल्हापुरातील कसबा बावड्यातून प्रचारफेरी काढण्यात आली. कसबा बावडा हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे ते गाव आहे. यामुळे तिथे सतेज कदमांच्या प्रचार फेरीला कितपत प्रतिसाद मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. या प्रचार फेरीला भाजप आमदार सुरेश हाळवणकर देखील उपस्थित होते. त्यांनी भाजपच्या स्वागतासाठी कसबा बावड्यातील महिलांनी काढलेली रांगोळी पालकमंत्र्यांच्या चमच्यांनी पाण्याचा टँकर आणून धुवून काढल्याची टीका करण्यात आली आहे. त्यांच्या या टीकेला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिले होते.

Dhananjay Mahadik
उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर संकट; कोंबड्यांचा तडफडून मृत्यु

सतेज पाटीलांच्या कार्यकर्त्यांनी ही रांगोळी कसबा बावड्यातील महिलांनी काढली नव्हती, तर भाजपच्या उमेदवाराची प्रचार फेरी असल्याने भाजपने ती एका महिलेला कंत्राट देऊन काढायला लावली होती, असा दावा करण्यात आली आहे. सकाळी ६;३० वाजता ते जेव्हा रांगोळी काढत होते, तेव्हा त्यांना त्याविषयी हटकले, तेव्हा त्यांनी भाजपकडून आम्हाला प्रत्येक गल्लीच्या सुरुवातीला अशी रांगोळी काढण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले आहे. रांगोळी काढत असतानाचा व्हिडीओ त्यांनी व्हायरल केला आहे. रात्री- अपरात्री रांगोळी काढून स्वागत करण्याची बावडेकरांची परंपरा नाही. बावड्यातील महिला स्वाभिमानी आहेत, त्यांना स्वागत करायचे असतं, तर हातात आरतीचे ताट घेऊन त्यांनी स्वागत केले असते.

एक महिला रस्त्यावर, दारात नव्हती यावरूनच भाजपच्या उमेदवारानं बावडेकरांच्या मनांत काय आहे? हे समजून घ्यावं, अशी वक्तव्य त्यांनी केले होते. दरम्यान, छत्रपती ताराराणी महाराणींच्या नगरित येऊन महिलांचे योगदान विसरलात का? असा प्रश्न फ्रखील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार धनंजय महाडिक यांना सर्वपक्षीय महिलांकडून करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com