उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर संकट; कोंबड्यांचा तडफडून मृत्यु

राज्यात उष्णतेचा पारा वाढल्याने माणसाप्रमाणे पशु- पक्षीही हैराण झाले आहेत
poultry
poultry रोहिदास गाडगे

पुणे: राज्यात उष्णतेचा पारा वाढल्याने माणसाप्रमाणे पशु- पक्षीही हैराण झाले आहेत, अशात उष्णतेमुळे पोल्ट्रीतील कोंबड्या मरण्याचे प्रमाण वाढल्याने पोल्ट्री (Poultry) व्यवसायिक धास्तवले आहेत. उष्णतेमुळे कोंबड्यांचा (hens) तडफडून मृत्यु झाला आहे. कोंबड्यांना इतर आजारांची लागण होत आहे. उष्णतेपासून बचावाच्या उपाययोजना करुन कोंबड्यांचा मृत्युदर वाढत आहे. उत्तर पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यातील डोंगराळ भागात तापमानाचा (temperature) पारा 40 अंशावर गेलाय दिवसेंदिवस उष्माघात वाढत आहे.

हे देखील पहा-

त्यामुळे कोंबड्यांना आजार वाढलेत यावर उपचार करुनही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच असल्याने पोल्ट्री व्यवसायिक धास्तावले आहेत. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या वाढसाठी पोषक वातावरणाची आवश्यकता असते. मात्र, अचानक वाढलेल्या तापमानामुळे पोल्ट्रीमधील वातावरण स्थिर रहात नाही. यासाठी कोंबड्यांना थंडावा मिळावा पाण्याचे फवारे देत आहेत. त्यातुन दिलासा मिळत नसल्याने कोंबड्यांची मरण्याचे प्रमाण वाढले असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणुन कुकुटपालनाकडे उळला आहे.

poultry
उद्यापासून सलग ५ दिवस बँका बंद; तातडीची बँक कामे मार्गी लावा

मात्र, गेल्या २ वर्षापासुन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी तोटाच ठरतो. पहिलं कोरोना महामारीत कोंबड्यांना फेकुन देण्याची वेळ आली. त्यात रोगराईचे संकट वाढले आणि आता महागाईचा फटका बसत असताना उष्णतेमुळे कोंबड्यांचा मृत्युदर वाढल्याने चिकनच्या पाठवठ्यात घट होऊन पुढील काळात चिकनचे दर वाढणार आहे. वाढत्या महागाईमुळे कुक्कुटपालन करणारे शेतकरी मेटाकुटीला आलेले त्यात उष्णतेचा पार वाढल्याने कोंबड्यांचा तडफडून मृत्यु होतो. त्यामुळे कोंबड्यांना वाचवणे शेतक-यांसाठी अधिकच जिकरीचे झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com