Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 20 September: आज शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, गणेश विसर्जन, मनोरंजन, क्रीडा, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

वर्धेतील इंडिया आलायन्सचे पदाधिकारी नजरकैदेत

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांची खबरदारी

- इंडिया आलायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मोदींना विचारले होते काही प्रश्न

- आज मोदींच्या दौऱ्यात आंदोलन होऊ नये म्हणून पोलीस सतर्क

- गुरुवारी रात्री पासून सर्व पदाधिकारी नजर कैदेत

- मोदींचे वर्धेत आगमन होताच त्यांना पोलीस मुख्यालय नेणार असल्याची माहिती

- किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, सुदाम पवार, तुषार उमाळे, नितेश कराळे यांच्यासह इतर नेते नजरकैदेत

नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील गलथान कारभार पुन्हा उघडकीस

- नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील गलथान कारभार पुन्हा उघडकीस

- बनावट नोकर भरतीचा आदेश व्हायरल झाल्यानंतर आता आयुक्तांच्या स्वाक्षरीचा ४ कोटी रुपयांचा बनावट ठराव उघडकीस आल्यानं खळबळ

- रस्ता काँक्रीटीकरणच्या 4 वेगवेगळ्या कामांचा ठराव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता

खोटी साक्ष दिल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मागितला पूजा खेडकरकडे खुलासा

खोटी साक्ष दिल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मागितला पूजा खेडकरकडे खुलासा

पूजा खेडकरने बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा UPSC चा आरोप

अटकपूर्व जामिनासाठी दाखल झालेल्या याचिकेवर आपल म्हणण मांडताना पूजाने खोटी साक्ष दिल्याचा UPSC चा आरोप

तर, दबाव टाकण्यासाठी UPSC ने जाणीवपूर्वक ही रणनीती आखल्याचा पूजा खेडकरच्या वकिलांचा दावा

२६ सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीच्या आधी खुलासा करण्याचे कोर्टाचे निर्देश

थकित विज बिल प्रकरणी विज पुरवठा खंडीत करणाऱ्या विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

थकित विज बिल प्रकरणी विज पुरवठा खंडीत करणाऱ्या विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला महाड तालुक्यातील बिरवाडी शहरात मारहाण झाली आहे. या प्रकरणी महाड MIDC पोलिस ठाण्यात योगेश झांजे रहाणार आकले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वितरण कंपनीचे कर्मचारी सदाशिव गावित यांनी कार्यालयीन आदेशाप्रमाणे थकित विज बिल वसूली प्रकरणी सुनिल देशमुख यांच्या दुकान गाळ्याचा विज पुरवठा खंडीत केला. याचा राग येऊन आरोपी योगेश झांजे यांनी विज वितरण कंपनीचे कर्मचारी गावित मोटर सायकलवरून जात असताना त्यांना आडवून त्यांच्या मोटर सायकलची चावी काढून घेतली. त्यांची कॉलर पकडून मारहाण करीत शिवीगाळ केल्याची तक्रार गावित यांनी महाड MIDC पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. शासकिय सेवा बजावत असताना सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकाणी आरोपी योगेश झांजे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Manoj Jarange Patil Health: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून मनोज जरांगे हे सागे सोयरेच्या अंमलबजावणी वरती ठाम असून, हैद्राबाद सह सातारा आणि बॉम्बे गॅझेट सरकारनं तात्काळ लागु करावं अशी त्यांची मागणी आहे .दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत काहीशी खालावली होती रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत असून त्यांना उपचाराची गरज असल्याचं काल डॉक्टरनी सांगितल.मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान सरकारकडून आंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांनी जरांगे पाटिल यांची भेट उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

Parbhani News: निम्न दुधनाचे दोन दरवाजे उघडले; धरणात ७५टक्के जलसाठा

सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पाचे दोन दरवाजे काल दुपारी ०.३० मीटरने उघडून २०२० क्युसेक दराने विसर्ग दुधना नदी पात्रात करण्यात येत आहे. धरणाची जलाशय पाणीपातळी ४२५.२१० मीटरवर पोहोचली आहे. सद्यस्थितीत धरणात जिवंत पाणीसाठा १८१.७८० दलघमी (७५.०५ टक्के) आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा निर्माणझाला होता. जालना जिल्ह्यातील मुसळधार पावसानंतर प्रकल्पाची पाणीपातळी ७५ टक्क्यांहून अधिक झाली. दोन वर्षांनंतर प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे.

PM Narendra Modi Vardha Visit: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, अमरावती येथील पीएम मित्रा पार्क, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ करणार आहे. कार्यक्रमासाठी पन्नास हजार नागरिकांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी 2 हजार 250 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय.. यासंह या ठिकाणी तीन दिवसाचे विश्वकर्मा योजनेतील यशस्वीगाथा दाखविणारे प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले आहे . समारोहात 15 हजार विश्वकर्मा, 5 हजार आयटीआय प्रशिक्षनार्थी, 20 हजार महिला बचत गटाच्या महिला याशिवाय यवतमाळ आणि अमरावती येथून 5 हजार विश्वकर्मा उपस्थित राहणार आहे.

Lonavala News: आई एकविरा देवीच्या चरणी नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्तांचे साकडं

लोणावळयातील आई एकविरा देवीच्या चरणी नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्तांनी साकडं घातलं आहे. नवी मुंबईतील शेतकऱ्यांनी सिडको ला कवडीमोल भावात 40 वर्षांपूर्वी जमिनी दिल्या. मात्र आता या शेतकऱ्यांनी उरलेल्या थोड्या जागेत घर बांधल्यावर त्या घरांना अनधिकृत घोषित करण्यात आले. याबाबत निवृत्त आयएएस अधिकारी विजय नाहटा यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र तब्बल 40 वर्षांनंतर देखील नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त समस्याच्या विळख्यात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा व प्रकल्प ग्रस्तांच्या बाजूने निर्णय लागावा या मागणीसाठी नवी मुंबईतील सर्व प्रकल्प ग्रस्तांनी लोणावळयातील आई एकविरा चरणी साकडं घातले....

Aheri Assembly: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने आरोग्य सेवा तुटपुंजी असल्याने नागरिकांना उपचाराकरिता तालुका मुख्यालयात धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आणि भामरागड तालुक्यातील ताडगाव अशा दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात बरेच दुर्गम व अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. शिवाय लोकसंख्येच्या मानाने या दोन्ही तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या देखील कमी आहे. या दोन्ही तालुक्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मान्यता द्यावी, यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रयत्न केले.

मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी महत्वाची बैठक

मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्याच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली महत्वाची बैठक

मंत्रालयात आज दुपारी ४ ते ५:३० वा दरम्यान या तीनही समाजा प्रलंबित विषयाचा आढावा या बैठकित घेतला जाणार

सकल मराठा समाजाकडून हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट यांसंदर्भात करण्यात आलेल्या मागणीबाबत मंत्री शंभूराज देसाई हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा

छत्रपती संभाजी नगर ते पुणे मार्गाचे नूतनीकरण 9 हजार कोटीतून; शासनाचा अध्यादेश जारी.

छत्रपती संभाजी नगर ते पुणे या विद्यमान मार्गाचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाने काल अध्यादेश जारी केला आहे.5 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे(MSIDC)हस्तांतरित करून या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा देण्याचा देखील निर्णय आता शासनाने घेतलाय. त्यानुसार NH -753F असा या मार्गाचा क्रमांक असणार आहे. पुणे ते शिरूर हा 53 किलोमीटर चा मार्ग सहा पदरी होईल यासाठी 7515 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर शिरूर अहमदनगर बाह्यवळण रस्त्या मार्गे छत्रपती संभाजी नगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासह सुमारे 9000 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे.

संजय पाण्डेय यांना भाजप नेते मोहित कंबोज यांचे थेट आव्हान

संजय पाण्डेय यांना भाजप नेते मोहित कंबोज यांचे थेट आव्हान

२०२२चा हिशेब २०२४मध्ये पूर्ण करू - कंबोज

पाण्डेय यांच्या काँग्रेस प्रवेशावर कंबोज यांचे आव्हान

याआधी कंबोज यांनी पाण्डेय यांना जेलमध्ये टाकण्याचे आव्हान दिले होते

पाण्डेय यांच्या जेलवारीनंतर कंबोज यांचे पुन्हा आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com