Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेच्या दागिन्यांची चोरी; अंधेरीतील प्रसिद्ध रुग्णालयातील प्रकार

Mumbai News Today: डी.एन.नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shivani Tichkule

संजय गडदे

Mumbai Crime News: श्वसनाच्या आजारासाठी अंधेरी पश्चिमेकडील एका प्रसिद्ध रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावरील दागिने अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कलावती यादव असे दागिने चोरीस गेलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी डी.एन.नगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. डी.एन.नगर पोलिसांनी कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

अंधेरी (Andheri) पूर्वेकडील पंप हाऊस परिसरात राहणाऱ्या कलावती यादव या महिलेला श्वसनाचा त्रास झाला म्हणून अंधेरी पश्चिमेकडील एका प्रसिद्ध रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी तपासणी करून ईसीजी काढण्याचे सुचवले.

ईसिजीसाठी पडदयाच्या पार्टीशनमध्ये घेतले. त्यावेळी उपस्थित नर्सने बाहेर उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडे दागिने आणि कपडे आणून दिले मात्र यात काही दागिने नसल्याबाबतचे तक्रार महिलेच्या पतीने त्या नर्स कडे केली. एवढेच दागिने असल्याबाबतचे नर्सने सांगितल्यानंतर पुन्हा तपासणी केल्यानंतरही दागिने शोधूनही सापडले नाही.

दरम्यानच्या काळात रुग्णालय प्रशासनाच्या सहकार्याने ईसीजी आणि अंतर रुग्ण विभाग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता रुग्ण महिलेच्या अंगावरील दागिने स्पष्ट दिसून आले. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील कर्मचारी आणि नर्सची तपासणी करून तुम्हा सांगू असे रुग्णाच्या नातेवाईकांना कळविले.

मात्र दोन दिवसानंतरही रुग्णालयाकडून सहकार्य झाले नाही म्हणून रुग्ण महिलेच्या मुलाने डी एन नगर पोलीस ठाण्यात दागिने चोरी संदर्भात अज्ञाता विरोधात तक्रार दिली आहे. यानुसार डी एन नगर पोलिसांनी कलम 380 भादवि नुसार गुन्हा केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT