Raigad Ambenali Ghat News: रायगडच्या आंबेनळी घाटात दरड कोसळली; महाबळेश्वरहून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प

Ambenali Ghat News: रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड हद्दीतील आंबेनळी घाटात मंगळवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली.
Raigad news Ambenali Ghat collapses Mahabaleshwar to Poladpur Traffic stopped
Raigad news Ambenali Ghat collapses Mahabaleshwar to Poladpur Traffic stoppedSaam TV

Raigad Ambenali Ghat News: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी सावध राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अशातच रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड हद्दीतील आंबेनळी घाटात मंगळवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली.

Raigad news Ambenali Ghat collapses Mahabaleshwar to Poladpur Traffic stopped
Pune Accident CCTV Footage : कारच्या धडकेत बाईकसह दोघे उंच उडाले, एकाचा मृत्यू; पुण्यातील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

रायगडच्या आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे ही दरड कोसळल्याने महाबळेश्वरहून पोलादपूरकडे आणि पोलादपूर होऊन महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस आणि रात्रीची वेळ असल्याने आता ही दरड आज सकाळपर्यंत हटवली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आंबेनळी घाटातून प्रवास न करण्याचे पोलादपूर तहसीलदारांनी आवाहन केले आहे. सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती.

Raigad news Ambenali Ghat collapses Mahabaleshwar to Poladpur Traffic stopped
Sambhaji Nagar News: हृदयद्रावक! बेलाची पाने तोडताना भिंत अंगावर पडली; पुजाऱ्याचा जागीच मृत्यू

आता मंगळवारी रात्रीच्या सुमारास रायगडच्या आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे ही दरड कोसळल्याने महाबळेश्वरहून पोलादपूरकडे आणि पोलादपूर होऊन महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज सकाळपासून दरड हटवण्याचे काम सुरू होणार आहे.

दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसांत कोकणासह रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने घाटमाथ्यावर वाहनचालकांनी सतर्कतेने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com