Pune ; धक्कादायक! फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला ठेवलं बाहेर  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune ; धक्कादायक! फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला ठेवलं बाहेर

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा परत सुरु करण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा परत सुरु करण्यात आले आहेत. राज्यात ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी आणि शहरामध्ये ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, आता शाळा सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी पुण्यात धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षीची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याला बाहेर ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे.

हे देखील पहा-

पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्ञानगंगा शाळेतील एका विद्यार्थ्याला फी न भरल्यामुळे बाहेर ठेवण्यात आले आहे. या अगोदर शाळांकडून केल्या जाणाऱ्या फी वसुलीबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केलं होतं.

आता फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याला बाहेर ठेवल्याच्या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. शाळांनी फी वरून सुरु केलेल्या मनमानी विरोधामध्ये पालक आणि विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी असा प्रकार संतापजनक असल्याची भावना पालकांमधून व्यक्त केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT