Nana Patole Saam Tv
मुंबई/पुणे

ऊर्जा मंत्र्यांनी केलेलं विधान चुकीचं; भाजपाने जे पेरलं ते उगवतय- पटोले

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर लक्ष घातले पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीत सगळं ठीक आहे.

रामनाथ दवणे

मुंबई: राज्यभरात नाना पटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्तीला मी मारु शकतो शिव्याही देऊ शकतो असे व्यक्तव्य केल्यानंतर राज्यभरात भाजपाच्यावतीने आंदोलन सुरु आहे. त्याच बरोबर सध्या विज कनेक्शन आणि विज बिलाचा मुद्दाही तापत आहे, त्यावर बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले ''भाजपने केलेलं हे पाप आहे. भाजपने जे पेरलं ते आता उगवतं आहे. त्यामुळे शेतकरी भरडले जात आहे. आज ऊर्जा मंत्र्यांनी केलेलं विधान बरोबर नाही''. नाना पटोलेंनी उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलेलं व्यक्तव्य चूकीचं असल्याचं म्हटलं आहे. राज्य अंधारात गेलं तर फक्त काँग्रेस जबाबदार राहणार नाही, तर संपूर्ण महाविकास आघाडी जबाबदार राहिल, त्यामुळे राज्य सरकारने महावितरणला निधी द्यावा” असे व्यक्तव्य नितिन राऊत यांनी केले होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर लक्ष घातले पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीत सगळं ठीक आहे. प्रत्येक मंत्री आपल्या खात्याची बाजू मांडतो. फडणवीस यांच्या काळात सगळी खाती ते एकटेच चालवायचे अशी टीकाही नानांनी फडणवीस यांच्यावरती केली आहे. भाजपचं हिंदुत्व हे राज्यानुसार बदलत जाते. दक्षिणेत गाय ही त्यांची देव नसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव झालेली असेल असे पटोले म्हणाले. OBC समाजावर अन्याय होणार नाही, याची सर्व काळजी सरकार घेईल असे आश्वासनही नाना पटोले यांनी दिले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

Padmadurg Fort : पावसाळ्यात पर्यटकांसाठी 'पद्मगड' ठरेल बेस्ट, तुम्ही कधी जाताय?

SCROLL FOR NEXT