Kishori Pedanekar Saam TV
मुंबई/पुणे

'राणा दाम्पत्य हे टाईमपास कपल; मातोश्रीच्या परिसरात पाय ठेवून दाखवावा'

'राणा दांपत्याचा फाजिलपणा चालला आहे, आमचं चँलेंज आहे की त्यांनी मातोश्रीवर येवून दाखवावं.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई : राणा दाम्पत्यांनी मातोश्रीच्या परिसरात पाय ठेवून दाखवावा, राणा दाम्पत्य हे टाईमपास कपल, त्यांना अधिक प्रसिद्धी देण्याची गरज नसल्याचं वक्तव्य मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलं आहे. आज खासदार नवणीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा आज मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या निर्धाराने आले होते. मात्र त्यांना पोलिसांनी नोटीस दिल्यामुळे तसंच शिवसैनिकांनी विरोध केल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली मात्र आपण उद्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या भूमिकेवर पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वर्षा बंगल्यावरुन मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी आल्यावर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच स्वागत केलं आणि मातोश्रीमध्ये ठरावीक शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर पेडणेकर बोलत होत्या.

हे देखील पाहा -

त्या म्हणाल्या, 'मुख्यमंत्र्यांनी सगळ्या शिवसैनिकांची विचारपूस केली. राणा दांपत्याचा फाजिलपणा चालला आहे. आमचे चँलेंज आहे की मातोश्रीवर येवून दाखवावं. यांच्या मागचे बोलविते धनी कोण हे माहित आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीने उर्जा मिळते. सनदी मार्गाने या, छुप्या मार्गाने नाही. मुख्यमंत्र्यांची प्रसन्न मुद्रा बघून छान वाटले. यांच्यामागे लागून वेळ फुकट घालू नका. आम्ही कुठल्याही पदावर असलो तरी आधी शिवसैनिक आहे. हे बालहट्ट आणि स्त्रीहट्ट तुम्हाला हे सर्व जे करायला सांगतात त्यांच्याकडे करा, हनुमान चालीसा हा हिंदुत्वाचा श्वास आहे.' मात्र, या मागचा भेसुर चेहरा हा सर्वांना माहित असल्याचही त्या म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT