ऐन थंडीत पुण्याचं राजकीय वातावरण तापलं; भाजपची होर्डिंग बाजी विरोधकांकडून टार्गेट अमोल कविटकर
मुंबई/पुणे

ऐन थंडीत पुण्याचं राजकीय वातावरण तापलं; भाजपची होर्डिंग बाजी विरोधकांकडून टार्गेट

पुण्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे

अमोल कविटकर, पुणे

पुणे : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा आज पुणे दौरा आहे. आणि यावरून पुण्यातील (Pune) राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. त्याला कारण ठरलंय या दौऱ्यासाठी पुणे शहरात भाजपने (BJP) केलेली होर्डिंगबाजी. या दौऱ्यात छत्रपती शिवरायांच्या (chhatrapati shivaji maharaj) पुतळ्याचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचे अनावरण पुणे महापालिकेत (Municipal Corporation) होत आहे.

हे देखील पहा-

मात्र, होर्डिंग लावताना त्यात या दोन्ही महापुरुषांचा फोटो (Photo) भारतीय जनता पक्षाने छापलेला नाहीये आणि हाच धागा पकडून पुण्यातील विरोधकांनी भाजपला टार्गेट केले आहे. या होर्डिंगबाजीचे पडसाद पुणे महापालिकेच्या सभागृहातही उमटले आहेत.

भाजपने केलेल्या होर्डिंगबाजीचा राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि मनसेने (MNS) सभागृहात आंदोलन करून निषेध करण्यात आला आहे. हे होर्डिंग म्हणजे महापुरुषांचा अपमान आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला तर स्वतःच्या सत्तेच्या काळात आघाडीला दोन्ही महापुरुषांचे पुतळे बसवता आले नाहीत. याचं दुःख आघाडीला आहे, म्हणूनच ते भाजपवर आरोप करत आहेत, असे भाजपचे म्हणणे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT