पाऊस नाही तरी गळतेय बँकेचे छत..

पाऊस नाही तरी गळतेय बँकेचे छत..
Bank of India
Bank of India
Published On

बुलडाणा : मलकापूर (Malkapur) येथील बँक ऑफ इंडियाच्‍या (Bank Of India) शाखेत कुठेही पाऊस (Rain) पडत नसतानाही बँकेचे छत गळत असल्याचे दिसून येत आहे. बँकेत आलेल्या ग्राहकांना साधे उभे सुद्धा राहता येत नाही. कारण बँकेमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचलेले आहे. (buldhana-news-Even-though-it-is-not-raining-the-roof-of-the-bank is-leaking)

Bank of India
‘काळा तांदूळ’ तोही साक्रीत; प्रयोगशील शेतकऱ्याने घेतले उत्पन्न

बँकेमध्ये टाइल्स लावण्यात आलेली असून त्यावर थोडे पाणी साचल्यास चालत असताना पाय घसरून दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेवरील छतात कुठेतरी पाइप लिकेज असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेचे छत गळत आहे.

कॅश, कागदपत्र होताय ओले

बँक ऑफ इंडियाच्‍या मलकापूर शाखेच्‍या कार्यालयात कॅश काऊंटर डिपॉझिट व सर्व बँकेच्या कामकाजा करिता रांगेत उभे असलेल्या बँकेच्या सिलिंगवरील पीओपीमधून पाणीचा विसर्ग होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांचे पैसे, महत्त्वाची कागदपत्रे ओले होत असून ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दोन महिन्‍यांपासून गळती

बँकेमध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य, कम्प्युटर, प्रिंटर आदी महत्‍त्वाच्या वस्तू असून त्या खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात शाखा व्यवस्थापकाशी बोलणे झाले असता त्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली असून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल अशी माहिती दिली. तर उपस्थित ग्राहकाशी बोललो असता त्यांनी गत दोन महिन्यांपासून हे पाणी तपासणी सुरू असल्याचे सांगितले. मात्र या बिल्डिंग मालकाचा हलगर्जीपणा झालेला दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com