"The old days were really good" - Minister Yashomati Thakur Saam Tv
मुंबई/पुणे

Achhe Din Promise: "पुराने दिन खरोखरच किती अच्छे होते"- मंत्री यशोमती ठाकूर यांचा मोदी सरकारला टोला

World Happiness Report News: जगातल्या १४६ देशांपैकी भारत हा १३६ व्या स्थानावर घसरला, तर पाकिस्ताना १२१ व्या क्रमांकाचा आनंदी देश ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: "पुराने दिन खरोखरच किती अच्छे होते" असं ट्विट करत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. जगातील आनंदी देशांची यादी (World Happiness Report 2022) नुकतीच जाहिर झाली, जगातल्या १४६ देशांपैकी भारत हा १३६ व्या स्थानावर घसरला, तर पाकिस्ताना १२१ व्या क्रमांकाचा आनंदी देश ठरला आहे. म्हणजेच पाकिस्तानसारख्या देशाहूनही भारत हा दुखी देश ठरल्याने विरोधकांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली आहे. ("The old days were really good" - Minister Yashomati Thakur slammed the Modi government)

हे देखील पहा -

याबाबत अ‍ॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "'पुराने दिन'च 'अच्छे' होते. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक सातत्याने खाली जातोय. मोदी सरकारच्या काळात सातत्याने भारत दुःखी राष्ट्रांच्या यादीत आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांचे असे अहवाल पाहिले की वाटतं 'पुराने दिन' खरोखरच किती 'अच्छे' होते" असं ट्विट करत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते तेव्हा त्यांनी आपल्या सर्व भाषणांत आणि प्रचार सभेत 'अच्छे दिन आने वाले है' (Achhe din aane waale hain) असा नारा दिला होता, तसेच परदेशातील भारताचा काळापैसा देशात परत आणून प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यात १५-१५ लाख जमा करु असं आश्वासनही मोदींनी २०१४ मध्ये दिलं होत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin B12च्या कमतरेचं कारण काय? या ३ चुका आत्ताच टाळा, अन्यथा...

Sayaji Shinde Birthday : साऊथमध्ये डॅशिंग व्हिलन, मराठीत हुकमी एक्का; कोट्यवधींचे मालक असूनही सयाजी शिंदेंचे पाय जमिनीवरच

NHAI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती; पगार १.७७ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नालासोप-यात मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी नेताना १० लाख ९ हजार रोख रक्कम पकडली

Alepak Recipe : हिवाळ्यासाठी खास आयुर्वेदिक आलेपाक कसा बनवावा? जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT