Shivsena-AIMIM: "भाजपच्या बी टीमसोबत शिवसेना कधीही जाणार नाही" - डॉ. मनीषा कायंदे

ShivSena- AIMIM Alliance: एमआयएमचे खासदार एम्तियाज जलील यांना एमआयएमला थेट मविआमध्ये घ्यावं अशी मागणी केल्यानं राजकारण तापलं.
Maisha Kayande On ShivSena- AIMIM Alliance
Maisha Kayande On ShivSena- AIMIM AllianceSaam Tv
Published On

मुंबई: एमआयएमशी महाविकास आघाडीच्या युतीबाबत राज्यात चांगलचं राजकारण सुरु आहे. महाविकास आघाडी एमआयएमला भाजपची बी टीम म्हणते, यामुळे एमआयएमचे खासदार एम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी एमआयएमला (AIMIM) थेट मविआमध्ये (MVA) घ्यावं अशी मागणी केल्यानं राजकारण तापलं. शिवसेना एमआयएमशी युती (Alliance) करणार का असा प्रश्न विचारला जात असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांनी स्पष्टीकरण देत शिवसना एमआयएमशी युती करणार नाही असं म्हटलयं. ("ShivSena will never go with BJP's B team AIMIM" - Said Dr. Manisha Kayande)

हे देखील पहा -

डॉ. मनीषा कायंदे (Dr. Manisha Kayande) म्हणाल्या की, हे खरे आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष शिवसेनेचे सत्तेतील घटक पक्ष आहेत. किमान समान कार्यक्रमवर (common minimum program) आमची सहमती आहे आणि त्याचप्रमाणे राज्यात कारभार सुरू आहे. आमचे तिघा पक्षांचे ठरले आहे, आता त्यात एमआयएमसारख्या पक्षाला आमच्यात स्थान नाही. मुळात एमआयएम हा भाजपची बी टीम म्हणूनच काम करत आला आहे आणि हे मुस्लिम जनतेलाही समजून चुकले आहे, असं त्या म्हणाल्या.

Maisha Kayande On ShivSena- AIMIM Alliance
Corona BA.2 Variant: भारताने आता मास्क काढले तरी चालतील - डॉ. रवी गोडसे (Saam EXCLUSIVE)

पुढे त्या म्हणाल्या की, एमआयएमला मत म्हणजे भाजपला मत. असे असतांना आम्ही एमआयएमला कदापीही महाविकास आघाडीसोबत घेणार नाही. महापालिका निवडणुकीत कोणाला सोबत घायचे आणि कोणासोबत आघाडी करायची याचा निर्णय आमचे पक्षप्रमुख मा उद्धव जी ठाकरे घेतील. त्यावर तेच भाष्य करतील. पण मी खात्रीने सांगते एमआयएम सोबत शिवसेना कधीही जाणार नाही असं म्हणत त्यांनी शिवसेना एमआयएम युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com