मित्रानेच केला मित्राचा खून, ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरातील घटना... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

मित्रानेच केला मित्राचा खून, ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरातील घटना...

तपासादरम्यान समजलं की, गुन्हा चोरीच्या उद्देशाने घडला नसून मित्रानेच मित्राचा खून केला आहे. बेचनप्रसाद चौहान असे मयत तरुणाचे नाव आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली: रिक्षातील प्रवाशाला रस्त्यात थांबवुन चोरीच्या उद्देशाने दोन जणांना ठोशा बुक्क्यांनी, चाकूने मारहाण करून त्यातील एकाची हत्या केली तर दुसऱ्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री रात्री साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात घडली. बेचनप्रसाद चौहान असे मयत तरुणाचे नाव असून बबलू चौहान असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलीस व रेल्वे पोलीसानी तपास सुरू केला. मात्र तपासा दरम्यान समजलं की गुन्हा चोरीच्या उद्देशाने घडला नसून मित्रानेच मित्राचा खून केल्याचे उघड झाले आहे. (The murder of a friend by a friend, the incident in the Thakurli parallel road area ...)

हे देखील पहा -

डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरामध्ये बेचेन आणि बबलू चौहान हे भाड्याने राहत होते. उत्तरप्रदेश येथे गावी जाण्यासाठी काल रात्री दीडच्या गाडीने कल्याण रेल्वे स्थानकाहून ते दोघे जाणार होते. त्यासाठी रिक्षाने ते शेलारनाका येथून साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली येथील समांतर रोडने जात होते. त्याचवेळी अनोळखी इसमानी त्यांची रिक्षा अडवून रिक्षा चालकास पळवुन लावले. त्यानंतर बेचेन आणि बबलू यांना चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण करून शेजारील ठाकुर्ली रेल्वे ट्रॅकवर नेले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले. यात बबलूने आरोपीच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचून तेथून पळ काढला. मात्र बेचेन हा त्यांच्या तावडीत सापडला. जखमी बबलूने ही माहिती पहाटे शेलार नाका येथील घरी पोहचला घडलेला प्रकार त्याने भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना सांगितला.

या प्रकरणाची माहिती मिळताच ते जखमीला सोबत घेऊन टिळकनगर पोलिस ठाण्यात पोहचले. बबलूला बेचेन जिवंत आहे की नाही याबाबत काहीच माहिती नव्हती. पोलिस बबलूने दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोचले. त्याठिकाणी बेचेनचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला. लूटीच्या इराद्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. ही हत्या की रेल्वे अपघात मृत्यू? याचा तपास करण्यासाठी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मदत रेल्वे पोलीस आणि टिळकनगर पोलीस घेऊन तपास चालू केला.

मात्र तपासात पुढे आले की वरील कोणता प्रकार घडला नसून  मित्रानेच मित्राचा खून केल्याचे पुढे आले. मयत इसमास त्याच्या सोबत राहणारा व गाववाला मित्र बबलू प्रसाद चौहान वय 35 वर्षे याने जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास रेल्वे पटरीवर फेकून दिले असल्याचे निष्पन्न झाले. बेचेन आणि बबलू चौहान हे दोघेही दारू पिऊन होते. रिक्षातून जात असताना ते एकमेकांशी भांडत होते. रिक्षाचालकास हे दारू पिऊन आहेत हे समजले, म्हणून रिक्षाचाकाने त्याला खाली उतरवले. पुढे हे भांडणं वाढले आणि बबलू प्रसाद चौहान याने आपला मित्र बेचेन चौहान याला जीवे ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास रेल्वे पटरीवर फेकून दिले असल्याचे निष्पन्न झाले. 

सदर आरोपीवर डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गु.र. नंबर 99/2021 कलम 302, 201 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बबलू प्रसाद चौहान यास अटक करण्यात आली असून पोलिसांचा पुढील तपास चालू आहे आणि आज दुपारी आरोपीला कोर्टात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT