"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं"; नवाब मलिक  Saam Tv
मुंबई/पुणे

"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं"; नवाब मलिक

या आंदोलनाला आता मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर मागील वर्षभरापासून केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करत असताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावे, शेतात जाऊन काम सुरू करावे, एक नवी सुरुवात करावी, असे आवाहन मोदींनी यावेळी केले आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर, देशभरामधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देखील मोदींच्या या निर्णयावर मत व्यक्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशात कृषी क्षेत्राकरिता दिलेल्या योगदानाची माहिती दिली आहे. त्यानंतर, केंद्र सरकारने लागू करण्यात आलेले ३ कृषी कायदे मागे घेत असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे. त्यानंतर, नवाब मलिक यांनी हा शेतकऱ्यांचा आणि शेतकरी आंदोलनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीतील या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावली होती. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी वर्षभरापासून आपले आंदोलन सुरूच ठेवले होते. या आंदोलनामध्ये लोकांनी प्राणाची आहुती देखील दिली आहे. शेतकरी काय मागे हटले नाहीत. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला आहे. ७ वर्षांत मोदींनी कधीही पाय मागे घेतला नाही. आता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका समोर आहेत. यामुळेच, पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Goa: मुंबईवरुन गोव्याला जायचे आहे? मग जाणून घ्या प्रवास करताना कोणता मार्ग सर्वोत्तम

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

GK: भारतातील पहिली मेट्रो सेवा कशी आणि कुठे सुरु झाली? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT