rottweiler Bite in Mumbai News Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai: कुत्र्याने घेतला होता चावा; न्यायालयाने मालकाला ठोठावली तुरूंगवासाची शिक्षा

अशा प्रकारे कुत्र्याने चावा घेतल्याने मालकाला झालेली शिक्षा अत्यंत दुर्मिळ आहे.

Gangappa Pujari

Mumbai: रॉटवेलर जातीचा कुत्रा चावल्याच्या प्रकरणात त्याच्या मालकाला तीन महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सांताक्रुझ येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याला शनिवारी दंडाधिकारी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून हे प्रकरण तेरा वर्ष जुने आहे.

मालकाला त्याचा कुत्रा आक्रमक जातीचा असल्याचे पूर्णपणे माहीती असूनही त्याने योग्य ती काळजी घेतली नाही त्यामुळे तो दोषी ठरतो, असे कोर्टाने सांगितले आहे. अशा प्रकारे कुत्र्याने चावा घेतल्याने मालकाला झालेली शिक्षा अत्यंत दुर्मिळ आहे. (Mumbai)

याबाबत अधिक माहिती अशी की, सांताक्रुझ येथे राहणारे व्यापारी पेर्सी होरिमजी आणि त्यांचे 72 वर्षीय नातेवाईक केर्सी इराणी रस्त्यावर एका जुन्या मालमत्तेच्या वादातून एकमेकांशी भांडत होते.

त्यावेळी त्यांच्या कारमध्ये रॉटवेलर आणि लॅब्रेडोर जातीचे दोन कुत्रे बंदीस्त होते. ज्यामधील रॉटवेलर जातीच्या हिंसक मानल्या जाणाऱ्या कुत्र्याला मालकाने अचानक सोडल्याने केर्सी इराणी यांच्यावर हल्ला केला.

कुत्र्याने केलेल्या या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला तीन वेळा चावा घेतल्याने ते रक्तबंबाळ झाले. हे प्रकरण तेरा वर्षांनी कोर्टात उभे राहिले. या खटल्यात मालकाला कोर्टाने दोषी ठरवण्यात आले आहे.

कोर्टाने आदेश देताना या होरमुस्जी यांनी अशा आक्रमक कुत्र्याला सार्वजनिक जागी नेताना योग्य ती काळजी घ्यायला हवी होती.

या केसमध्ये वयोवृद्ध इराणी यांना तीन वेळा हा कुत्रा चावला आहे. त्यामुळे ही सार्वजनिक ठिकाणी बाळगायची साधी काळजीही त्यांनी घेतली नसल्याने त्यांना कोर्ट दोषी मानत असल्याचे कोर्टाने निकाल देताना स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसला भाजपचा मोठा झटका; माजी राज्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ' | Politics

Maharashtra Live News Update: रस्त्याच्या वादातून तणाव! खेड तालुक्यात जैदवाडीत दगडफेक आणि वाहनांची तोडफोड

Shirvale Recipe : मॅगीसारखा दिसणारा कोकणातला हा पदार्थ कोणता? वाचा परफेक्ट शिरवाळ्याच्या पीठाची रेसिपी

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा आठवा अध्याय कोणती शिकवण देतो?

Personality Traits: 'R' अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

SCROLL FOR NEXT