Shahaji Bapu Patil
Shahaji Bapu Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Shahaji Bapu Patil: आसामच्या मुख्यमंत्र्यांना देखील शहाजी बापूंची भुरळ!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Shahaji Bapu Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत शिंदे गटातील सर्वच आमदार, खासदार काल गुवाहाटीला गेले होते. या दौऱ्यात त्यांनी कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं. या दौऱ्यात आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याआधी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील जेव्हा गुवाहाटीला गेला होते तेव्हा त्यांचा काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के हा डायलॉग तुफान गाजला होता. आता शहाजीबापूंच्या याच डायलॉगची भुरळ आसामच्या मुख्यमंत्र्यांना पडली.

गुवाहाटी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटातील सर्वच आमदार, खासदार यांनी गुवाहाटीचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भेट घेतली. तेव्हा हेमंत बिस्वा शर्मा यांनी शहाजी बापूंना त्यांचा काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकदम ओक्के हा डॉयलॉग म्हणायला लावला. शहाजीबापू यांनी देखील त्यांच्या विनंतीचा मान राखत त्यांचा डायलॉग मराठी भाषेसह इंग्रजीत बोलून दाखवला.

मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी पाच महिन्यांपूर्वी बंड केले. त्यावेळी ते सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. गुवाहाटीत असताना शहाजीबापू यांनी गावातील एका कार्यकर्त्याला फोन केला होता. तेव्हा शहाजीबापू यांनी आपण गुवाहाटी असल्याचं सांगितलं होत.

गुवाहाटी दौऱ्याला चार मंत्र्यासह सहाजण गैरहजर, शिंदे गटात नाराजी? चर्चांना उधाण

या दौऱ्याला चार मंत्री आणि दोन आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील या नेत्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुटल चर्चा सुरु झाल्या आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गुवाहाटीला गेले होते. मात्र आजच्या दौऱ्यात शिंदे गटाच्या या दौऱ्यात मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभुराज देसाई गैरहजर राहिले आहेत. तर मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणेदेखील गुवाहाटीला गेले नाहीत.  

नेत्यांनी गैरहजेरीबाबत स्पष्टीकरण दिलं असलं तरी शिंदे गटात नाराजी आहे का? शिंदे गटातील काही आमदार मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सत्तास्थापनेनंतर शिंदे गटाचा हा अत्यंच महत्त्वाचा दौरा मानला जातोय. मुख्यमंत्री स्वत: उपस्थित असताना या नेत्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: महायुतीच्या सभेला सुरुवात; राज ठाकरे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभे ठिकाणी दाखल

Orange Side Effect: संत्री कोणी खाऊ नये?

Delhi Liquor Policy Scam: अरविंद केंजरीवाल यांच्याविरोधात ईडीने दाखल केली चार्जशीट

Aditi Rao Hydari : तुझ्या घायाळ नजरेने माझं काळीज जिंकलं

Summer Foods: उन्हाळ्यात 'या' भाजीचे सेवन शरीरासाठी ठरेल उपयुक्त

SCROLL FOR NEXT