जे कोणी सरनाईकांच्या मागे लागलेत, त्यांनी कामात स्पर्धा करुन दाखवा - मुख्यमंत्री Saam Tv News
मुंबई/पुणे

जे कोणी सरनाईकांच्या मागे लागलेत, त्यांनी कामात स्पर्धा करुन दाखवा - मुख्यमंत्री

प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदार संघात ऑक्सिजन प्लांट स्थापन केला आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले, सोबतच भाजपवर नाव न घेता निशाणा साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मीरा-भाईंदर मतदार संघातील जनसंपर्क कार्यालयात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्लांट स्थापन केला आहे. या ऑक्सिजन प्लांटचे लोकर्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा हा प्लांट परदेशातून मीरा भाईंदरमध्ये आणण्यात आला आहे. या प्लांटमधून दररोज १२० सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. मीरा भाईंदरमधील नागरिकांना हे ऑक्सिजन सिलेंडर शिवसेनेतर्फे मोफत दिले जाणार आहेत. हा प्लांट २४ तास लोकांना सेवा देईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रताप सरनाईकांचे तोंड भरुन कौतुक केले, सोबतच भाजपावर नाव न घेता हल्ला केला. (The Chief Minister lauded Pratap Sarnaik and also targeted the BJP)

हे देखील पहा -

राजकारणात स्लेजिंग होतं

तुमच्या मागे काही करंटे लोकं लागले असतानाही तुम्ही न डगमगता शिवसेनेचा वसा घेत जिद्दीने काम करत आहात. आजपर्यंत क्रिकेटमध्ये स्लेजिंग होत होती आणि आता राजकारणात होत आहे. जे कुणी प्रताप सरनाईक यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी प्रतापच्या लोकोपयोगी कामांची स्पर्धा करुन दाखवावी. अशी हेल्दी कॉम्पीटेशन करुन दाखवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं आहे.

प्रताप सरनाईक यांच्याकडून धडा घ्यावा

तुमच्या सर्वांच्या साथीने जर मी देशात एक नंबरचा मुख्यमंत्री झालो तर त्यात नवल काय? मी केवळ निमित्तमात्र आहे. आंदोलनं करायची असेल तर त्याला आरोग्यादायी स्पर्धा करा. केंद्राच्या मर्यादा आहेत तशा राज्याच्या सुद्धा आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. सोबतच ''एकनाथजी प्रताप सरनाईक चांगलं काम करतायत त्यांना कुठेही कट मारु नका.'' असा विनोद करत त्यांनी सरनाईकांचे कौतुक केले. तसेच आपल्या राजकीय प्रतीस्पर्ध्यांनी प्रताप सरनाईक यांच्याकडून धडा घ्यावा. संकटं कितीही आली तरी आपला शिवसैनिक आणखीण पुढे जातो. तर हे एक उत्तम उदाहरण आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT