बलात्कार फक्त 11 मिनिटांसाठी झाला म्हणत... कोर्टाने दिला 'असा' निकाल

केवळ 11 मिनिटे बलात्कार केला म्हणून बलात्कार प्रकरणातील एका दोषीची शिक्षा कोर्टाने कमी केल्याचे प्रकरण समोर आले.
बलात्कार फक्त 11 मिनिटांसाठी झाला म्हणत... कोर्टाने दिला 'असा' निकाल
बलात्कार फक्त 11 मिनिटांसाठी झाला म्हणत... कोर्टाने दिला 'असा' निकालSaam Tv
Published On

बर्न: केवळ 11 मिनिटे बलात्कार केला म्हणून बलात्कार Rape प्रकरणातील एका दोषीची शिक्षा कोर्टाने कमी केल्याचे प्रकरण समोर आले. एका महिला न्यायाधीशाने Female Judge हा निकाल दिला. या निकालानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्वित्झर्लंडमधील Switzerland न्यायलयाने हा निकाल दिला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात शेकडो लोक स्वित्झर्लंडमध्ये रस्त्यावर उतरले होते. न्यायालयाबाहेर निदर्शने करणारे लोक न्यायाधीशाकडे आपला निर्णय मागे घेण्याची मागणी केली गेली. यानंतर लोकांनी महिला न्यायाधीशाच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला.

हे देखील पहा-

कृत्यातील आरोपींपैकी एका अल्पवयीन आरोपीला अद्याप न्यायालयाने शिक्षा सुनावलेली नाही तर इतर आरोपींना 51 महिन्यांची शिक्षा झाली आहे. आता महिला न्यायाधीशाने तुरुंगातील आरोपींची शिक्षा 36 महिन्यांपर्यंत कमी केली आहे. म्हणजेच कोर्टाने ३३ वर्षाच्या दोषीची शिक्षा कमी करून तीन वर्षांची शिक्षा सुनावली.

बलात्कार फक्त 11 मिनिटांसाठी झाला म्हणत... कोर्टाने दिला 'असा' निकाल
चंद्रकांत पाटील राज ठाकरेंना भेटल्याने अमित शहांनी पाटलांची भेट टाळली? (व्हिडिओ)

न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, पीडित महिलेने आरोपीला प्रथम 'सिग्नल पाठवले होते' त्यामुळे आरोपींना धैर्य मिळाले. न्यायाधीशांच्या या वक्तव्यांमुळे तेथील जनता प्रचंड संतापली आहे.

आंदोलकांमध्ये बहुतांश महिला होत्या. पीडितेविरोधात एकता दाखवण्यासाठी हे सर्व आंदोलक न्यायालयाबाहेर जमले होते. या सर्वांनी 11 मिनिटे मौन पाळले. या लोकांच्या हातात एक बॅनर होता ज्यावर लिहिले होते की '11 मिनिटे खूप जास्त आहेत '.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com