विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवणाऱ्या आईचे व्हॉट्सअॅप हॅक करत लेकीने उकळली खंडणी
विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवणाऱ्या आईचे व्हॉट्सअॅप हॅक करत लेकीने उकळली खंडणी  
मुंबई/पुणे

विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवणाऱ्या आईचे व्हॉट्सअॅप हॅक करत लेकीने उकळली खंडणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: आईचे व्हॉटस्अप हॅक (Watsaap hack0 करुन खंडणी (Ransom) मागणाऱ्या मुलीला पुण्यातील खंडणी पथकाने ताब्यात घेतले आहे. कर्वेनगर (Karvenagar) येथील २१ वर्षीय तरुणीसह आणखी एकाला पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. तर, त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. आईशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यावसायिकाकडे तिने १५ लाखांची मागणी केली होती. सुरुवातीला बदनामीच्या भितीने त्याने ३ लाख रुपये दिले मात्र नंतर त्याने पोलीसांकडे तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीच्या आईचे एका व्यावसायिकाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे आपल्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्याला अद्द्ल घडवण्यासाठी मुलीने आईचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून दोघांचे खासगी फोटो मिळविले. ते फोटो लीक करु अशी धमकी देत तिने व्यावसायिकाकडे १५ लाखांची मागणी केली. सुरुवातीला बदनामीच्या भितीने व्यावसायिकाने मुलीला ३ लाख रुपये दिले. मात्र हळूहळू तिची पैशाची मागणी वाढतच चालली होती. त्यानंतर त्याने पुणे पोलीसांकडे याची तक्रार केल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून तिला रंगेहात पकडले.

या प्रकरणात एका ४२ वर्षीय व्यक्तीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर कर्वेनगर येथील २१ वर्षीय तरुणीसह पोलिसांनी मिथून मोहन गायकवाड (वय २९, रा. कुरबावी, ता. माळशिरस) आणि या दोघांना अटक केली आहे. तर, त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी याबाबत माहिती दिली. ४२ वर्षीय तक्रारदाराचा बिल्डिंग साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. मे महिन्यात दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या दुकानात जाऊन आधी बांधकाम साहित्याची चौकशी केली. त्यानंतर अचानक शिवीगाळ करत तुझे एका महिलेसोबतच्या संबंधाचे फोटो आमच्याकडे असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांना कारमध्ये बसवून अलंकार पोलीस चौकीजवळ नेऊन मारहाणही केली. त्यांचा मोबाइल हिसकावून घेत त्यातील फोटो व व्हिडिओ घेत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे १५ लाखांची मागणीही केली. सुरुवातीला प्रत्येक महिन्याला एक लाख व आठ महिन्यानंतर सर्व पैसे देण्याबाबत त्यांनी व्यावसायिकाला धमकावले.

या दरम्यान खंडणीचे पैसे देण्यासाठी तक्रारदाराने स्वत:ची कार आणि बुलेटही विकली. मात्र आरोपींची पैशाची मागणी वाढतच होती. त्यांच्या या पैशाच्या मागणीला वैतागून शेवटी त्यांनी पोलीसात तक्रार केली आणि पोलीसांनी आरोपींना रंगेहात पकडले. तोपर्यंत आरोपी गायकवाडने मिळालेल्या पैशातुन त्याच्यावरील कर्ज फेडले. तर तरुणीने त्या पैशातुन मोठ्या प्रमाणात कपडे खरेदी केली.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Speech: 'तुमचा पक्ष तुम्हाला लखलाभ', PM मोदींच्या ऑफरवरुन शरद पवारांचा टोला

Sonalee Kulkarni: मराठमोळ्या अभिनेत्रीचं गुलाबी सौंदर्य, साडीतल्या फोटोंनी केलाय कहर

PM Narendra Modi : आता काँग्रेस देशाचं मन मारत आहे; मणिशंकर यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा घणाघात

Driving License: ड्राईव्हिग टेस्ट न देता काढा 'या' पद्धतीने ड्राईव्हिग लायसन्स

Delhi Weather: ऐन उन्हाळ्यात दिल्लीत अचानक वातावरण बदललं; वादळ आणि पावसाचा तडाखा, दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT