Thane News Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Water Supply : ठाण्यात काही दिवस अनियमित पाणीपुरवठा, कारण काय?

Thane News : ठाणे शहरात सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिसे पंपिंग स्टेशनमध्ये गाळ आणि कचरा साचल्याने पाणीपुरवठा २५% घटला आहे. पुढील काही दिवस ठाणेकरांना अनियमित आणि गढूळ पाण्याचा सामना करावा लागणार आहे.

Alisha Khedekar

  • भातसा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने ठाणे शहरातील पाणीपुरवठा २५% घटला

  • पिसे पंपिंग स्टेशनमध्ये गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्यांचा साठा झाला

  • गढूळ पाण्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेत अडचणी, नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन

  • पुढील काही दिवस ठाण्यातील पाणीपुरवठा अनियमित राहणार असल्याचे महापालिकेचे स्पष्ट

ठाणे शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागणार आहे. मागील तीन दिवसांपासून भातसा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पाणीपुरवठ्याच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे. सलग अतिवृष्टीमुळे पिसे पंपिंग स्टेशनच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ, झाडांच्या फांद्या, कचरा साचला असून नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले असून पंपिंगची क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी ठाणे शहराकडे जाणारा पाणीपुरवठा तब्बल २५ टक्क्यांनी कमी झाला आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंपाच्या स्टेनरमध्ये अडकलेला गाळ व कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु नदीपात्रातील पाण्याच्या गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतही अडचणी निर्माण होत आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा परिणाम थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, पुढील काही दिवस ठाणे शहरात अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या काळात पाण्याचा वापर जपून करावा, पाणी साठवून ठेवावे आणि पिण्यापूर्वी नक्की उकळून घ्यावे. कारण पाण्याच्या गढूळपणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात अशा घटना घडत असल्याने नागरिकांना अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेने नागरिकांना धीर धरावा, घाबरून जाऊ नये आणि पाणीपुरवठ्यातील अडचणी तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, शहरातील वाढती लोकसंख्या आणि दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अशा समस्यांमुळे ठाणेकरांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणीही पुन्हा एकदा जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीची EOW करणार चौकशी, नेमकं काय आहे प्रकरण?

Navratri Alta Design: नवरात्रीसाठी पारंपारिक अलता डिझाईन्स, पायाचं सौंदर्य येईल खुलून

Maharashtra Live News Update: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

Shahapur : ८० लाखाचा बारदान घोटाळा; दोषी मोकाट असल्याचा आरोप, लेखापालांच्या चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह

GST: गुड न्यूज! जीएसटीमध्ये आणखी कपात होणार, पीएम मोदींनी दिले संकेत

SCROLL FOR NEXT