THANE WATER SUPPLY SHUTDOWN: MIDC ANNOUNCES 24-HOUR WATER CUT IN MUMBRA, DIVA AND KALWA FROM JUNE 18 Saam tv
मुंबई/पुणे

Thane Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना बसणार फटका?

Thane Water Cut News : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा आणि इतर काही भागांमध्ये १८ जून दुपारी १२ वाजल्यापासून १९ जून दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Alisha Khedekar

  • ठाण्यात पाणीबाणी

  • मुंब्रा, दिवा आणि कळवा परिसरात

  • १८ ते १९ जूनदरम्यान २४ तास पाणीपुरवठा बंद

  • एमआयडीसीने २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय

  • पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे

एकीकडे पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे राज्यात पाणी टंचाईचं संकट ओढवलं आहे. अल निनोसारख्या महाभयंकर वादळामुळे पाऊस अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रात व्यपलेला नाही. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शेतकरी राजा शेतात पावसाची एखाद्या चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. दरम्यान पाऊस नसल्याने आणि वाढत्या तापमानामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी आता तळ गाठला आहे. यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुरुवार १८ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवार १९ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंब्रा, दिवा, कळवा तसेच काही भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

यंदा अल निनो (El Niño) आणि आयओडी (Indian Ocean Dipole) यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जलसंपदा विभागासोबत ९ जून २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.

या शटडाऊनचा परिणाम ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीच्या बहुतांश भागांवर होणार आहे. मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील काही भाग वगळता उर्वरित सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच वागळे प्रभाग समिती अंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक २, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव या भागांनाही या बंदीचा फटका बसणार आहे.

महापालिकेने नागरिकांना पाण्याचा योग्य साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी आगाऊ खबरदारी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पाणी संकट आणखी गडद; कोणत्या धरणात किती साठा? ताजी आकडेवारी आली समोर

Skin Care: चेहऱ्यावर रोज टॅल्कम पावडर लावता? मेकअप आर्टिस्ट म्हणतात यामुळे चेहऱ्याला होतात हे त्रास

Maharashtra News Live Update: अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

काळे की पिवळे, आरोग्यासाठी कोणते खजूर सर्वात बेस्ट?

Shivsena UBT : ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटणार; १४-१६ आमदारही पक्ष सोडणार? आमदारानं नेमकं टायमिंग सांगितलं

SCROLL FOR NEXT