Parenting Tips : मुलं डाळ-भाजी पाहताच नाक मुरडतात? पालकांनो! एकदा फॉलो करा 'या' ट्रिक्स, ५ दिवसांत सवय बदलेल

Shreya Maskar

जबरदस्तीने खाऊ घालू नका

जेव्हा मूल खायला नकार देतात, तेव्हा पालक जबरदस्तीने डाळ-भात खाऊ घालतात. मात्र हे चुकीचे आहे. यामुळे मुलं खातात पण ते मनापासून नसते, ज्यामुळे त्यांच्या शरीराला पोषण मिळत नाही. मुलांशी संयमाने वागा त्यांना वेळ द्या.

Do not force feed | pinterest

सवय लावा

डाळ, भात, भाजी , चपाती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे मुलांनी कितीही नाही म्हटले तर सुरुवातीला थोडं थोडं का होईन त्यांना हे पदार्थ प्रेमाने आणि हुशारीने खाऊ घाला. त्यांना यांच्यातील पोषणाचे महत्त्व पटवून द्या.

food | pinterest

एकत्र जेवायला सुरुवात करा

अनेक स्त्रिया आधी आपल्या मुलाला खाऊ घालतात आणि मग स्वतः जेवतात. पण तुम्हाला जर मुलाला डाळ- भाजी खाऊ घालायची असेल तर त्यांच्यासोबत जेवायला बसले पाहिजे. कारण मुलं पालकांचे अनुकरण करतात. पालकांना एखादी गोष्ट करताना पाहून शिकतात.

Start eating together | pinterest

मनोरंजनात्मक जेवण

मुलांना छोट्या छोट्या खेळांच्या माध्यमातून जेवण खाऊ घाला. यामुळे मुलाला नवीन पदार्थ खाण्याची सवय लागते. जर तुमचे मूल अन्नाशी खेळत असेल, तर रागावू नका त्यांना तसे करू द्या.

An entertaining meal | pinterest

आवडीचे पदार्थ खाऊ द्या

जर तुमची मुलं काही ठराविक भाज्या खात नसतील तर त्यांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांमधून ते खाऊ घाला. उदा घरी बनवलेले सँडविच, पिझ्झा

Eat favorite foods | pinterest

स्क्रीनपासून दूर ठेवा

जेवणाच्या वेळी मुलांना फोन, टिव्हीपासून दूर ठेवा. तुम्ही त्यांच्या बाजूला बसून त्यांना खाऊ घाला. त्यांच्याशी बोला, जेणेकरून ते त्यांत गुंतून राहतील आणि सर्व जेवण खातील.

Keep away from the screen | pinterest

मुलांना जेवणाची आवड लावा

मुलांना जेवणाची आवड लावण्यसाठी त्यांना जेवणाचे छोटे छोटे भाग खाऊ द्या. त्यात आकार, रंग यांचा समावेश करा. मुलांना पदार्थाचा वास घेऊ द्या. मुलांना ओरडे टाळा.

Make children love food | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पालकांनो! मुलं ऐकत नाहीत म्हणून ओरडू नका, तुमच्या 'या' ५ चुका वेळीच सुधारा

Parenting Tips | saam tv
येथे क्लिक करा...