Shreya Maskar
मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी सुरुवातीपासूनच काही नियम बनवा. उदा. (झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ, अभ्यासाची वेळ आणि खेळण्याची वेळ) हे जेव्हा नियम स्पष्ट असतात, तेव्हा मुलांना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे समजते. तसेच या नियमांचे महत्त्व पटवून द्या.
मुले त्यांच्या पालकांकडून सर्वाधिक शिकतात. जर तुम्हाला तुमचे मूल शांत राहावे आणि इतरांशी चांगले बोलावे असे वाटत असेल, तर तुम्ही प्रथम स्वतः तसे वागा. आपल्या वागणुकीतून मुलांना शिकवा. प्रत्येक लहानसहान गोष्टीवर रागावल्याने किंवा मोठ्याने बोलल्याने मूलही तेच वागणे अंगीकारू शकते. म्हणून, नेहमी शांतपणे आणि आदराने बोला.
मुलांवर तुमच्या अपेक्षा लादू नका. त्यांना कशाची आवड आहे हे जाणून घेऊन त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करा. मुलं एखादी गोष्ट चुकत असेल तर त्यांना न मारता आणि ओरडता समजावून सांगा. मुलांशी स्पष्ट आणि सोपा संवाद साधा.
पालकांच्या अनेकदा लक्षात तेव्हाच येते जेव्हा त्यांचे मूल चूक करते. पण जेव्हा ते काहीतरी चांगले करतात, तेव्हा त्यांची प्रशंसा करायला विसरू नका. कायम मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या. कौतुकामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच त्यांना भविष्यात चांगले वागण्यास प्रोत्साहन मिळते.
मुलांच्या चुकीवर न ओरडता त्या चुकीचे परिणाम त्यांना समजवून द्या. चांगले-वाईट, खरे-खोटे, चूक-बरोबर नेमकं काय, हे त्यांना समजावून सांगा. यामुळे मुलांमध्ये जबाबदारीची भावना विकसित होते.
तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमच्या मुलाने तुम्हाला सर्व सांगावे, तुमचे सर्व ऐकावे तर याचा बेस्ट उपाय म्हणजे मुलांचे मित्र बना. एखाद्या मित्राप्रमाणे त्यांना वागवा, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना तुमची भीती नाही वाटली पाहिजे. त्यांना कोणत्याही विषयावर तुमच्या मन मोकळ्या गप्पा मारता आल्या पाहिजे.
बरेच पालक मुलं ऐकत नाही म्हणून त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टींची भीती घालतात. मात्र याचा मुलांचा मानसिकतेवर वाईट परिणाम होतो आणि मुलं पालकांपासून दुरावतात आणि त्यांचे अजूनच ऐकत नाही.
आजकाच्या धावपळीच्या जगात पालक मुलांना पुरेसा वेळ देत नाही, त्यामुळे मुलं चिडचिडी आणि हट्टी होता. त्यामुळे तुम्हीला कामाला जात असाल तरी रोज मुलांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे, हे पाहा. जेणेकरून त्यांना तुम्ही आहात कायम त्यांच्यासोबत ही प्रेमाची भावना जाणवेल.