Shreya Maskar
मासिक पाळी येण्याआधी आणि आल्यावर औषधे घेणे टाळा. कारण याचा महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो.
पेन किलर पीरियड्सदरम्यान पोटदुखीसाठी उपयुक्त असले तरी, त्याचे अति सेवन केल्याने पोटाच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे मळमळ, आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते.
मासिक पाळीत बदल करण्यासाठी बनवलेल्या गोळ्यांमुळे मुरुमे, चक्कर येणे, इतर शाररिक समस्या आणि रक्तदाब वाढणे यांसारखे त्रास होऊ शकतात.
तज्ञांच्या मते, मासिक पाळीच्या काळा दरम्यान पेन किलर किंवा पीरियड्स पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्यास हार्मोन्सचे संतुलन बिघडते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारखे हार्मोन्स महिलांच्या शरीरात नियमितपणे तयार होतात आणि नष्ट होतात.
औषध जास्त प्रमाणावर खाल्ल्याने डोकेदुखी आणि पोटात मळमळ होते. उलट्याही होतात. चक्कर येते. मूड स्विंग्स, चिडचिड किंवा नैराश्य यांसारख्या भावनिक समस्या देखील जाणवू शकतात.
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते. या गोळ्यांमुळे शरीरात विविध हार्मोनल बदल होतात, जे यकृतासाठी हानिकारक असू शकतात. यकृतामध्ये सूज, पेशींनाही नुकसान आणि वेदना होऊ शकतात.
मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्यांच्या दीर्घकालीन वापरामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही औषधे शरीरातील नैसर्गिक हार्मोनल संतुलन बिघडवतात. सततच्या वापरामुळे अंडाशयांना नुकसान पोहोचू शकते यामुळे भविष्यात गर्भधारणा होण्यास अडचणी येतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.