Shreya Maskar
मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी काही फळे खाणे टाळली पाहिजेत किंवा मर्यादित प्रमाणात खावीत. ही खळे आपल्या शरीराला गरम पडतात.
पीरियड्समध्ये जास्त साखर असलेली फळे, आम्लयुक्त लिंबूवर्गीय फळे आणि ॲसिडीटीला कारणीभूत ठरू शकणारी फळे खाऊ नका. यामुळे सूज, पेटके आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात.
संत्री, लिंबू आणि ग्रेपफ्रूटमुळे पोटात जळजळ होऊ शकते. शरीरातील आम्लपित्त वाढल्याने चक्कर येणे , अस्वस्थ वाटते. तसेच पोटात मळमळ सुरू होते.
आंबे, अननस आणि काही सुक्या फळांमुळे साखरेचे प्रमाण जास्त असते. जे खाणे टाळा. यामुळे अधिक गोड खाण्याची इच्छा वाढते.
कच्ची पपई शरीरास अधिक गरम पडते, त्यामुळे हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो.
कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असते. मासिक पाळीत आधीच ब्लोटिंगची समस्या असताना कलिंगड खाल्ल्याने पोट जास्त फुगू शकते आणि शरीरात पाणी साचून राहण्याची समस्या वाढू शकते.
कच्च्या केळीमध्ये 'रेझिस्टंट स्टार्च' असतो, जो पचायला जड असतो. यामुळे बद्धकोष्ठताची समस्या उद्भवते. पोट जड होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.