Periods Care : पीरियड्समध्ये करा 'हा' एकच रामबाण उपाय, त्वचेवर खाज अन् पुरळ येणारच नाही

Shreya Maskar

मासिक पाळी

मासिक पाळीच्या दरम्यान होणारी खाज, पुरळ आणि लाल चट्टे हे प्रामुख्याने सॅनिटरी पॅड्समधील ओलावा, उष्णता आणि घर्षण, तसेच हार्मोन्समधील चढ-उतार यामुळे होतात, ज्यामुळे त्वचेची संवेदनशीलता वाढते. त्वचेच्या या समस्या पीरियड्सच्या ३-५ दिवस आधी दिसतात. त्या साचलेल्या घामामुळे आणि जिवाणूंच्या वाढीमुळे वाढतात, ज्यामुळे दाह आणि अस्वस्थता निर्माण होते.

Headache | pinterest

पॅड

मासिक पाळीतील पुरळ, खाज याचे मुख्य कारण म्हणजे बराच काळ पॅड न बदलणे. यामुळे प्रायव्हेट पार्टच्या आसपासची त्वचा लाल होऊ शकते आणि कोरडी पडू शकते.

Sanitary Pads | pinterest

त्वचेवर खाज-पुरळ

पीरियड्समध्ये दर ३ ते ४ तासांनी पॅड बदला. रात्री झोपण्यापूर्वी प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि कापसाच्या बोळ्याने किंवा हाताने प्रायव्हेट पार्टच्या आसपासच्या जागेवर नारळाचे तेल लावा. जेणेकरून तेथील त्वचा मऊ होते.

Skin Itching and Rashes | pinterest

कडुलिंब

कडुलिंब त्याच्या दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखला जातो. प्राचीन काळापासून कडुलिंबाचा वापर केस आणि त्वचेसाठी केला जात आहे.

Neem | pinterest

कडुलिंबाचा वापर कसा करावा?

पुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात १५ ते २० कडुलिंबाची पाने उकळा आणि काही मिनिटे तशीच राहू द्या. जेव्हा कडुलिंबाच्या पानांमधून अर्क बाहेर पडू लागतो, तेव्हा गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्या. या पाण्याने अंघोळ करा, त्वचेवरील सर्व संसर्ग दूर होतील.

Neem use | pinterest

त्वचेची जळजळ

सूज आणि जळजळ ही मासिक पाळीतील पुरळांची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. मासिक पाळीत त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे स्वच्छता हा घटक खूप जास्त महत्त्वाचा आहे.

Skin Irritation | pinterest

बर्फ लावा

एका स्वच्छ सुती कापड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि तो मासिक पाळीच्या पुरळावर लावा. यामुळे वेदना किंवा जळजळीपासून त्वरित आराम मिळेल. तुम्ही हे दिवसातून दोनदा करू शकता.

Ice | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Periods | pinterest

NEXT : पीरियड्समध्ये पिंपल्समुळे चेहरा खराब दिसतो, ट्राय करा 'हा' रामबाण उपाय रातोरात Pimples होतील गायब

Periods Skin Care | pinterest
येथे क्लिक करा...