Periods Skin Care : पीरियड्समध्ये पिंपल्समुळे चेहरा खराब दिसतो, ट्राय करा 'हा' रामबाण उपाय रातोरात Pimples होतील गायब

Shreya Maskar

मासिक पाळी

बहुतेक महिलांना मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान चेहऱ्यावर प्रचंड पिंपल्सचा त्रास होतो. पिंपल्समुळे चेहऱ्यावर काळे डाग देखील पडतात. अशावेळी त्वचा खूपच संवेदनशील होते. पिंपल्स कमी करण्यासाठी सिंपल घरगुती उपाय करा.

Menstruation | pinterest

कोरफड

मासिक पाळीच्या काळात येणाऱ्या पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफडीच्या पानांमधील गर चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे तसेच ठेवून नंतर थंड पाण्याने धुवा. हे दिवसातून दोनदा करा. चेहऱ्यावर एकही पिंपल्स येणार नाही.

Aloe Vera | pinterest

टी ट्री ऑइल

कापसाच्या बोळ्यावर थोडे टी ट्री ऑइल घ्या आणि थेट पिंपल्सवर लावा. १० मिनिटे तसेच राहू द्या, नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

Tea Tree Oil | pinterest

दही

पिंपल्स घालवण्यासाठी दही देखील खूप उपयुक्त ठरते. तुम्ही बोटावर थोडे दही घेऊन ते चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा, त्यानंतर थंड पाण्याने धुवा. तसेच त्वचेला मॉइश्चराइजर लावा.

Yogurt | yandex

बर्फाचा वापर

बर्फाचा एक तुकडा स्वच्छ कापडात गुंडाळून ५ ते १० मिनिटे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वरित आराम मिळेल. त्वचा मऊ होते. तसेच चमकदार बनण्यास मदत मिळते.

Using Ice | pinterest

दूध

एका बाऊलमध्ये हळद , पाणी आणि दूध मिक्स करून एक पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

Milk | pinterest

मध

मध आणि दालचिनी फेस मास्क चेहऱ्यावर लावा. यातील पोषक घटकांमुळे त्वचेला पोषण मिळते आणि चेहऱ्यावरील डाग, सूज कमी होते.

Honey | pinterest

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Pimples | pinterest

NEXT : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Periods Mental Health | saam tv
येथे क्लिक करा...