Shreya Maskar
रक्तातील साखर आणि मनःस्थिती स्थिर ठेवण्यासाठी पालेभाज्या, कडधान्य आणि कमी चरबीयुक्त प्रथिने असलेले पदार्थ खा. तसेच जास्तीत जास्त फळे खा. फक्त शरीराला गरम असलेली फळे खाऊ नये. उदा, पपई
कॅफीन, जास्त मीठ आणि साखरयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. याचे सेवन जास्त केल्यास पोट फुगणे, चिडचिड आणि चिंता वाढते. तसेच आपल्याला पटकन राग येतो.
चिडचिड कमी करण्यासाठी मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी ६ असलेले पदार्थ फायदेशीर ठरतात. बदाम , काजू ,भोपळ्याच्या बिया, एवोकॅडो हे पदार्थ खा.
मासिक पाळीच्या दरम्यानही नियमित २०-३० मिनिटांसाठी योगा करा.चालणे किंवा पोहणे यांसारखा हलका व्यायाम केल्याने एंडोर्फिन वाढतात आणि चिंता कमी होते. तसेच वेदनाही कमी होतात.
पीरियड्समध्ये खूप थकवा जाणवतो अशावेळी खूप चिडचिड होते आणि मूड स्विंग्स होतात, त्यामुळे भरपूर झोप घ्या. दररोज रात्री ७-८ तास तरी झोपा.
पोट दुःखी, ॲसिडीटी आणि शारीरिक अस्वस्थता कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे शरीर खूप हायड्रेट राहते, ज्यामुळे तुम्ही कायम फ्रेश फिल कराल आणि तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील.
पीरियड्समध्ये टेन्शन कमी घ्या. अति विचार टाळा. मन शांती करण्यासाठी ध्यान, योगा करा. तणावातून बाहेर या आणि आनंदी राहा. आनंदी राहण्यासाठी छंद जोपासा. उदा, गाणी ऐका, कुकिंग , चित्रकला, फिरायला जा
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.