Period Care : पीरियड्समध्ये अति गोड खाणे पडू शकते महागात, फूड क्रेव्हिंग 'असं' करा कंट्रोल

Shreya Maskar

मासिक पाळी

पीरियड्समध्ये हार्मोनल बदल, इस्ट्रोजेन कमी होणे आणि प्रोजेस्टेरॉन वाढणे तसेच सेरोटोनिन (आनंदी संप्रेरक) ची पातळी कमी झाल्यामुळे गोड खाण्याची तीव्र इच्छा होते.

Menstruation | pinterest

प्रथिनयुक्त पदार्थ

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भूक कंट्रोल करणे. त्यामुळे आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे गोड खाण्याची इच्छा नियंत्रित ठेवण्यास आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत मिळते.

Protein-Rich Foods | pinterest

जंक फूड टाळा

महिलांनी मासिक पाळीच्या काळात हेल्दी खावे. जंक फूड टाळावे, त्याऐवजी धान्य, कडधान्ये, फळे, हिरव्या भाज्या आणि डाळी यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.

Avoid Junk Food | pinterest

गोड खाण्याची इच्छा

गोड खाण्याची इच्छा कंट्रोल करण्यासाठी दही आणि चीज हे चांगले पर्याय आहेत. हे शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करू करतात. मात्र याचे सेवन करताना बाहेरील अतिरिक्त साखर टाकू नये.

Sweet Cravings | pinterest

कॅल्शियमयुक्त पदार्थ खा

महिलांनी मासिक पाळीच्या काळात आहारात भरपूर कॅल्शियमचा समावेश करावा, कारण ते सेरोटोनिनची पातळी नियंत्रित करते. उदा. दूध, दही, पनीर, चीज, ताक

Calcium-Rich Foods | pinterest

मूड स्विंग

सेरोटोनिन हे मूडमधील बदलांसाठी जबाबदार असलेले हार्मोन आहे. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही एक ग्लास दूध पिऊ शकता. कोमट दूध प्या.

Mood Swings | pinterest

चांगले वातावरण

मासिक पाळीच्या काळात आपले मन शक्य तितके शांत आणि स्थिर ठेवा. घरात सुखद वातावरण ठेवून तुम्ही गोड खाण्याची इच्छा कमी करू शकता. यामुळे तुम्ही अधिक आनंदी राहाल आणि पुढील समस्या टाळता येतील.

Happy Mood | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Period

NEXT : पीरियड्सच्या वेदना कमी करतील ‘हे’ सिंपल उपाय, पोटदुखी नाहीशी होईल

Period Care Tips | saam tv
येथे क्लिक करा...