Shreya Maskar
मासिक पाळी दरम्यान गरम पाण्याने अंघोळ केल्यास पोटातील पेटके आणि तणाव कमी होण्यास मदत होते. तुम्हाला अधिक आराम पाहिजे असेल तर तुम्ही सुगंधी तेलाने शरीराला थोडे मालिश करा आणि मग अंघोळ करा.
वेदना कमी करण्यासाठी पोटाच्या खालच्या भागाला मालिश करा. तसेच गरम पाण्याने शेक द्या. यामुळे तुम्हाला काही सेंकदात आराम मिळेल.
आलं, कॅमोमाइल, पेपरमिंट आणि बडीशेप यांचा चहा पोटदुखी कमी करण्यासाठी आणि पोटाला आराम देण्यासाठी प्रभावी आहे. पीरियड्समध्ये रोज एक कप हा चहा प्या.
मासिक पाळीत भरपूर पाणी प्यायल्याने पोटदुखी होत नाही. तसेच पोट फुगण्याची समस्या (अपचन, जास्त गॅस, बद्धकोष्ठता) कमी होते.
मॅग्नेशियम (केळी, डार्क चॉकलेट, पालेभाज्या), ओमेगा-३ फॅटी ऍसिड (अक्रोड, सॅल्मन) आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, अतिरिक्त मीठ, कॅफीन आणि अल्कोहोल यांचे सेवन मर्यादित करा, कारण यामुळे पीरियड्समध्ये पोट दुखी वाढते.
मासिक पाळीत नियमित हलका व्यायाम करा. यात चालणे, योगासने यांचा समावेश करा. रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. यामुळे पीरियड्समध्ये पोटाच्या वेदना कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.