Period Hygiene Tips : 'पीरियड्स'मध्ये पॅड वापरत असाल, तर 'या' ५ गोष्टींची घ्या खबरदारी, नाहीतर उद्भवेल मोठी समस्या

Shreya Maskar

मासिक पाळी

मासिक पाळीत कोणताही संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता करणे सर्वात महत्त्वाचे आहे. कपड्यांची, वस्तूंची नीट स्वच्छता करा.

Menstruation | pinterest

पीरियड्स पॅड

पीरियड्स पॅड बदलण्याच्या वारंवारतेकडे लक्ष द्या. मासिक पाळीच्या काळात नियमितपणे पॅड बदलणे खूप महत्त्वाचे आहे.

Menstrual Pads | pinterest

पॅड कधी बदलावे?

तज्ञांच्या मते, दर ४-६ तासांनी पॅड बदलावे. दीर्घ कालावधीसाठी पॅड वापरल्याने जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो. योग्य वेळी पॅड बदलल्याने त्वचेचे संरक्षण होते.

Change Pads | pinterest

पॅडची क्वालिटी

पॅड खरेदी करताना, त्यातील घटकांकडे लक्ष द्या. सुती आणि हवा खेळती राहणारे पॅड त्वचेसाठी सर्वात सुरक्षित मानले जातात. त्यांचाच वापर करा.

Pad Quality | pinterest

त्वचेला संसर्ग

स्वस्त किंवा रसायनयुक्त पॅडमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो आणि जळजळ किंवा खाज येऊ शकते. असे पॅड आता तुमचे पैसे वाचवतील मात्र भविष्यात मोठे आजार होऊ शकतात.

Skin Infections | pinterest

पॅडचे आकार

दिवस आणि रात्रीसाठी वेगवेगळ्या आकाराचे पॅड वापरावेत. दिवसा हलके आणि पातळ पॅड आरामदायक असतात. तर रात्री लांब आणि जाड पॅड अधिक संरक्षण देतात. यामुळे रक्तस्रावाच्या वेळी गळतीची शक्यता कमी होते.

Pad Sizes | pinterest

स्वच्छता

पॅड बदलताना हात धुणे आवश्यक आहे. जुने पॅड प्लास्टिकच्या पिशवीत टाका आणि त्यांच्या आजूबाजूला स्वच्छता राखा. यामुळे संसर्ग आणि जीवाणूंचा धोका कमी होतो.

Hygiene | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Menstruation | pinterest

NEXT : पीरियड्समध्ये महिलांसाठी बेस्ट आहे 'हे' स्किन केअर रूटीन, पिंपल्स चेहऱ्यावर दिसणारच नाही

Period Skincare | saam tv
येथे क्लिक करा...