Thane Water Cut for 24 Hour Saam tv
मुंबई/पुणे

Thane Water Shortage : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद; वाचा सविस्तर

Thane Water Cut for 24 Hour: ठाण्यात एमएमआरडीएच्या जलवाहिनी कामामुळे शनिवार ते रविवार २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अनेक भाग प्रभावित होणार असून नागरिकांनी पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

  • एमएमआरडीएच्या जलवाहिनी कामामुळे निर्णय

  • अनेक भाग पूर्णपणे प्रभावित

  • पाणी सुरू झाल्यानंतर कमी दाबाने पुरवठा

  • नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

Thane Water Cut For 24 Hours ठाणेकरांनो लक्ष द्या! येत्या शनिवार आणि रविवारी २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पुरेसा पाणी साठा करावा असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए मार्फत आनंद नगर ते साकेत पर्यंत एलिव्हेटेड रोडच्या कामादरम्यान, इंदिरा नगर संपकडे जाणारी ८१३ मि.मि. व्यासाची उर्ध्ववाहिनी बाधित होत असल्याने एमएमआरडीए कडून ९०० मि.मि. व्यासाची जलवाहिनी २२०० मीटर पैकी ५२० मीटर अंतरापर्यंत अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे.

एमएमआरडीएने ५२० मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातील ८१३ मि.मि. व्यासाची जलवाहिनी निकामी करून नव्याने अंथरण्यात आली आहे. ९०० मि.मि. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरीता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या कामाकरीता शनिवारी २७ मार्च रोजी सकाळी ९ : ०० ते रविवार, २८ मार्च रोजी सकाळी ९ : ०० वाजे पर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहील.

या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिके अंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवले नगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा नं २, ३ व ४ चैत्तीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसन नगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रूपादेवी पाडा, रामनगर, सी. पी. तलाव, येऊर परिसर इत्यादी भागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी पूर्ण पणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT