वाहतूक नियमांचं उल्लंघन करून ई-चालान न भरण्याची प्रकरणांची जिल्ह्यातील वाहतूक शाखेकडे आकेडवारी समोर आली आहे. ठाणे शहरात (Thane Traffic) जानेवारी २०१९ ते २०१४ मध्ये एकूण २५ लाख ७१ हजार ०८७ प्रकरणं प्रलंबित आहेत, तर १६९ कोटी ९८ लाख १५ हजार ६८० रूपये प्रलंबित रक्कम आहे. (latest marathi news)
ही प्रकरणं तडजोडीने निकाली काढण्यासाठी वाहतूक शाखेनं पुढाकार घेतला आहे. सिग्नल मोडणे, जलद गतीने वाहन चालविणे, रेसिंग करणे, हेल्मेट न वापरणे, क्षमतेपेक्षा अधिक सामानाची वाहतूक करणे यामध्ये ठाणेकर पुढे असल्याचं दंडाच्या रकमेवरून समजते. येत्या ३ मार्च रोजी लोकअदालत पार पडणार (Traffic Violating Fine) आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नियम मोडण्यात ठाणेकरांची आघाडी
सिग्नल मोडणे, जलद गतीने वाहन चालविणे, रिक्षाचालकांनी पुढील सीटवरून प्रवाशांची वाहतूक करणे, मोबाईलवर बोलणे, सीटबेल्ट न लावता कार चालवणे ही प्रकरणे अधिक असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे. प्रत्येक वर्षाला चार लोकअदालती आयोजित करणे अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकअदालतील प्रकरणं आल्यानंतर चालकांना दिलासा मिळेल, असं त्यांनी सांगितलं (Thanekar Violating Traffic Rules)आहे.
सिग्नल मोडणे, जलद गतीने वाहन चालविणे, रेसिंग करणे, हेल्मेट न वापरणे, क्षमतेपेक्षा अधिक सामानाची वाहतूक करणे यामध्ये ठाणेकर पुढे आहेत. १८ वर्षांखालील मुलांनी परवाना आणि परमिटशिवाय वाहन चालविणे, उलट्या दिशेने वाहन चालविणे याचं प्रमाणदेखील ठाण्यात (Thane) खूप जास्त आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, रिक्षाचालकांनी पुढील सीटवरून प्रवाशांची वाहतूक करण्याची संख्या देखील जास्त आहे. चारचाकी वाहनाला काळ्या रंगाच्या काचा लावणे, फॅन्सी नंबर वापरणे, लेन कटिंगचं प्रमाण ठाण्यात जास्त आहे.
लोकअदालतीविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न
लोकअदालतीविषयी जनजागृती वाढावी म्हणून वाहतूक शाखा, तीनहात नाका येथे हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत हा हेल्प डेस्क कार्यरत असणार आहे. वाहनचालकांनी किती रक्कम भरायची, हे लोकअदालतीमधील पॅनल ठरविणार असल्याचं जिल्हा विविध प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी सांगितलं (Thane Traffic Violating Fine) आहे.
सिग्नल मोडणे, जलद गतीने वाहन चालविणे, रिक्षाचालकांनी पुढील सीटवरून प्रवाशांची वाहतूक करणे, मोबाईलवर बोलणे, सीटबेल्ट न लावता कार चालवणे असे प्रकार ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडत (Traffic Rules)आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.