Manasvi Choudhary
जगातील ५५ देशांतील ३८७ शहरांच्या सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांची यादी प्रकाशित झाली आहे.
जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पुणे शहराचा नंबर आहे.
विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर हे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षी, पुण्यात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी वेळ हा २७ मिनिटे आणि ५० सेकंद लागला होता.
पुणे येथे औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्था यामुळे जगभरातून लाखोंच्या संख्येने नागरिक आले आहेत.
टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार, वाहतूक कोंडीच्या जागतिक क्रमवारीत दिल्ली ४४ तर मुंबई ५४व्या स्थानावर आहे.
लंडन हे जगातील सर्वाधिक ट्राफिक जाम असलेले पहिल्या क्रमाकांचे शहर आहे.