Manasvi Choudhary
मुंबई ते नवी मुंबई ही दोन महानगरे शिवडी-न्हावा शेवा या सागरी सेतूने जोडल्यानंतर मुंबई आणि ठाणे ही दोन महानगरे बोगद्याने जोडण्यात येणार आहेत.
ठाणे ते बोरिवली या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. सध्या हे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतात.
यासाठी एमएसआरडीसीने ठाणे ते बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून १२ किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत.
हा भूमिगत मार्ग ११.८ किमी लांबीचा असून या भूमिगत मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे होतील. तसेच मार्ग हा प्रत्येक बाजून ३ पदरी असा एकूण सहा मार्गिकेचा असेल.
यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्डलाईफने एमएमआरडीएला मंजुरी दिली आहे.
या बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने केले जाणार आहे.
बोरिवली ते ठाणे २३ किलोमीटरचा प्रवास केवळ २० मिनीटांत करता येणार आहे.