आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या पुणेकरांची मंगळवारी (१३ फेब्रुवारी) मोठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. कारण, गणेश जयंतीनिमित्त शहरातील मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनाकरीता भाविकांची मोठी गर्दी होत असते. याचा सर्वात मोठा फटका वाहतुकीला बसतो. अनेक भागात कोंडी झाल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. हीच बाब लक्षात घेता मंगळवारी वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीत बदल केले आहेत. (Latest Marathi News)
दरम्यान, आधीच शहरात ठिकठिकाणी मेट्रो, उड्डाणपूल आणि रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक संथ झाली असताना, सर्वांत वाहता रस्ता पूर्ण बंद करून ही वाहतूक ठप्प करण्याचा हा प्रयोग वाहतूक पोलिस थांबविणार आहेत की नाही, असा संतप्त सवाल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विचारला जात आहे.
पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक (अलका टॉकीज) चौक आणि पुढे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याने (फर्ग्युसन रस्ता) जावे लागणार आहे.
छत्रपती शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक- टिळक चौकातून पुढे टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे, असं वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.
स. गो. बर्वे चौकातून पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून जावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करून ती बाजीराव रस्त्याने सरळ सोडण्यात येईल, अशी माहिती देखील वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.