Weather Alert: विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा ताजा अंदाज

Maharashtra Rain Update: मराठवाड्यासह विदर्भात पुढील 2-3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
Weather Update 13 February 2024
Weather Update 13 February 2024Saam TV
Published On

Weather Update 13 February 2024

राज्यातील काही भागातून थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. उकाड्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिलाय. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय. हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा इशारा दिलाय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Weather Update 13 February 2024
Political Explainer : अशोक चव्हाण भाजपसाठी इतके महत्वाचे का आहेत? जाणून घ्या कारणे?

मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात पुढील 2-3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आलाय.

विदर्भात कुठे पावसाचा इशारा?

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.

मराठवाड्यातही पावसाची शक्यता

दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील २८ जिल्ह्यांमध्ये गारपीटीची अशी कोणतीही शक्यता नाही. मात्र, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहील, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

Weather Update 13 February 2024
Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, १३ फेब्रुवारी २०२४ या ५ राशींचे बदलणार भाग्य; मिळणार मोठं यश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com